

Importance of cultivating 'the second family' consisting of friends and mentors for emotional well-being
Sakal
देवयानी एम., लाइफस्टाइल कोच
मागच्या आठवड्यात माझ्या एका विद्यार्थिनीला मी विचारलं, ‘‘तुझे मित्र-मैत्रिणी आहेत ना ज्यांच्याशी तू मनमोकळं बोलू शकतेस?’’ ती म्हणाली, ‘‘हो, म्हणजे आहेत.. काही हवं असेल तर फोन करते.’’ तिचं उत्तर ऐकून मी क्षणभर थांबले. मित्र म्हणजे गरज पडली की आठवण काढायची माणसं? आणि बाकीच्या वेळी प्रत्येकजण आपल्या आयुष्यात बिझी! किती सहजपणे आपण मैत्रीची व्याख्याच बदलून टाकली आहे.