गोकुळाष्टमीच्या उत्सवाची घराघरांत आतुरतेने वाट पाहिली जाते, विशेषतः ज्या घरात बाळाचा जन्म व्हायचा असेल, तेथे तर नक्कीच. श्रीकृष्ण हा एक आदर्श अवतार. कृष्णाचा जन्म, त्याचे बालपण, त्याचे तत्त्वज्ञान याकडे फक्त एक कथा म्हणून न पाहता जर आयुर्वेदिक दृष्टिकोनातून पाहिले तर लक्षात येईल की श्रीकृष्णांनी प्रत्येक कृतीमधून आपल्याला आरोग्याचा संदेश दिलेला आहे. यावर्षी श्रीकृष्णाष्टमी आणि भारताचा स्वातंत्र्यदिन हे एकाच दिवशी आलेले आहेत. श्रीकृष्णांनी दिला तसा स्वातंत्र्याचा आणि आरोग्याचा संदेश दुसरे कोणी देऊ शकत नाही.