Penile Reconstruction Surgery: यशस्वी शस्त्रक्रियेतून कर्करोगाने गमावलेले लिंग पुन्हा मिळाले; लता मंगेशकर हॉस्पिटलच्या डॉक्टरांची किमया

Successful Penile Reconstruction Surgery after Cancer in India: कर्करोगाने गमावलेले लिंग लता मंगेशकर हॉस्पिटलमध्ये यशस्वी शस्त्रक्रियेतून पुन्हा मिळाले.
Successful Penile Transplant in India | Lata Mangeshkar Hospital
Successful Penile Transplant in India | Lata Mangeshkar Hospitalsakal
Updated on

Cancer Survivor Gets New Genitals Through Surgery: कर्करोगामुळे लिंग गमावलेल्या तरुणावर उपराजधानीतील वैद्यकीय पथकाने दुर्मिळ शस्त्रक्रिया केली. तब्बल साडेनऊ तास चाललेल्या या गुंतागुंतीच्या शस्त्रक्रियेअंतर्गत एकाच टप्प्यात कृत्रिम लिंग यशस्वीरीत्या प्रत्यारोपित करण्यात आले. मध्य भारतातील ही पहिलीच शस्त्रक्रिया असल्याचा दावा करण्यात येत आहे.

हिंगणा रोड येथील लता मंगेशकर हॉस्पिटलमध्ये ही शस्त्रक्रिया पार पडली. हा रुग्ण मूळचा राजस्थानचा असून कर्करोगाच्या व्याधीमुळे आठ वर्षांपूर्वी लिंग गमवावे लागले. त्यानंतर बऱ्याच शारीरिक समस्यांचा सामना करावा लागला. लता मंगेशकर रुग्णालयातील प्लास्टिक सर्जनच्या चमूबाबतची माहिती मिळाली. तरुणाने रुग्णालय गाठले.

डॉ. जितेंद्र मेहता, डॉ. समीर महाकाळकर, डॉ. अश्विनी पंडितराव, डॉ. देव पटेल, डॉ. अभिराम मुंडले, डॉ. कंवरबीर, डॉ. पल्लवी यांनी शस्त्रक्रिया केली. डॉ. अंजली भुरे, डॉ. मधुश्री शहा, डॉ. केतकी मारोडकर, डॉ. रचना नैताम, डॉ. गुंजन हे बधिरीकरण तज्ज्ञ म्हणून काम पाहिले. अधिष्ठाता डॉ. सजल मित्रा यांच्या मार्गदर्शनात वैद्यकीय अधीक्षक डॉ. नितीन देवस्थळे यांनी सर्व मदत केली. शस्त्रक्रियेतून रुग्ण पूर्ण बरा झाला आहे.

अशी झाली शस्त्रक्रिया

लिंगाच्या रचनेसाठी रुग्णाच्या हाताच्या वरच्या बाजूला शाफ्ट आणि मूत्रमार्गाची (मूत्रमार्गाची नळी) पुनर्बांधणी करण्यात आली. नंतर जांघेच्या भागात लावण्यात आले. लिंगात रक्तपुरवठा करणे, नसांमध्ये पूर्ण संवेदना प्रदान करणे आणि एक कार्यशील अवयव निर्माण करण्यासाठी सूक्ष्म रक्तवाहिन्या जोडणे या बाबींचा समावेश या शस्त्रक्रियेत होता.

अशा शस्त्रक्रियांना वैद्यकीय भाषेत मायक्रोव्हस्क्युलर शस्त्रक्रिया संबोधले जाते. यासाठी आवश्यक अत्याधुनिक ऑपरेटिव्ह मायक्रोस्कोप लता मंगेशकर हॉस्पीटल येथे उपलब्ध आहे. कर्करोगाव्यतिरिक्त अशा पुनर्रचनात्मक प्रक्रिया, ट्रॉमाटिक (अपघाती) लिंग विच्छेदन आणि लिंग पुष्टीकरण शस्त्रक्रिया (लिंग बदल शस्त्रक्रिया) असलेल्या रुग्णांसाठी या सुविधा फायदेशीर ठरू शकतात.

- डॉ. सजल मित्रा, अधिष्ठाता, एनकेपी साळवे मेडिकल कॉलेज, लता मंगेशकर रुग्णालय.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com