

Causes and Symptoms of Spinal Nerve Compression
Sakal
डॉ. जयदेव पंचवाघ (मेंदू आणि स्पाईन सर्जन)
आरोग्य‘चेतना’
‘‘डॉक्टर, गेली पाच वर्षे मी कशी काढली हे माझं मलाच समजत नाही.’’ निर्मलाताई मला सांगत होत्या. अत्यंत कर्तव्यदक्ष व कार्यक्षम शिक्षिका म्हणून निर्मलाताई नावाजलेल्या होत्या.
त्यांचा बराच कार्यकाळ मुंबईत गेलेला. गेल्या पाच-सहा वर्षापासून त्यांच्या कार्यक्षमतेला एक अत्यंत वेदनादायक अडथळा सुरू झाला होता. तो म्हणजे तीव्र कंबरदुखीचा.