
Lung Exercises: आजच्या काळात श्वास घेण्यासाठी शुद्ध हवा मिळणं मोठं आव्हान बनलं आहे. विशेषतः दिल्लीसारख्या मोठ्या शहरांमध्ये वायूप्रदूषण इतकं वाढलं आहे की, लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांच्या फुफ्फुसांवर त्याचा परिणाम दिसून येतो. विशेषतः तरुणांमध्ये सुद्धा श्वसनासंबंधी समस्या, दम लागणे, सतत खोकला आणि थकवा ही लक्षणं वाढत चालली आहेत.