

Maharashtra Sees 2X Growth in Organ Transplants, Shows Government Economic Survey Data
sakal
राज्यात अवयवदानाबाबत जनजागृती वाढत असून, गेल्या तीन वर्षांत अवयव प्रत्यारोपणाची संख्या जवळपास दुप्पट झाली आहे. २०२३ मध्ये २ हजार ७९२ असलेली अवयव प्रत्यारोपणांची संख्या २०२५ मध्ये ५ हजार २२ वर पोचली आहे. विशेषतः मूत्रपिंड आणि यकृत प्रत्यारोपणाचे प्रमाण अधिक असल्याचे राज्य सरकारने नुकत्याच प्रसिद्ध केलेल्या आर्थिक पाहणी अहवालाच्या आकडेवारीतून समोर आले आहे.