Mahashivratri 2023 : महाशिवरात्रीला भांग पिण्याचा प्लान केलाय? आधी हे वाचाच

भांग पिण्याचे काही फायदेसुद्धा आहेत. तेसुद्धा जाणून घेऊयात.
Mahashivratri 2023
Mahashivratri 2023esakal

Mahashivratri 2023 : आज देशभरात शिवभक्त महाशिवरात्री साजरी करताय. त्या निमित्ताने अनेकांनी उपवास केलेत. तर आज अनेक ठिकाणी रंगपंचमी आणि महाशिवरात्रीच्या निमित्ताने अनेक जण भांग पितात.तुम्हीही भांग पिण्याचा विचार करत असाल तर त्याआधी भांग पिण्याआधी कुठल्या गोष्टी खाऊ नयेत ते जाणून घेऊया. तसेच भांग पिण्याचे काही फायदेसुद्धा आहेत. तेसुद्धा जाणून घेऊयात.

भांग पिण्याचे काही साइड इफेक्ट्ससुद्धा आहेत

भांग पिणे अनेकांच्या आरोग्यासाठी धोकादायकसुद्धा ठरू शकते. अनेकांना मळमळ, उलट्या, पचनसंस्थेमध्ये अडथळा, पाहण्याची, ऐकण्याची आणि समजण्याची क्षमता कमी होणे, खूप जास्त बडबड करणे. काही काही जणांना डॉक्टरकडे जाण्याची गरज पडते. तेव्हा तुम्हाला झेपत नसल्यास भांग पिऊ नये.

भांग पिण्याआधी या गोष्टी लक्षात ठेवा

  • चुकूनही उपाशा पोटी भांग खाऊ नका. भांग पिण्याआधी तुम्ही काहीतरी खाऊन घ्यावे. भांग तुम्ही मिल्कशेकमध्ये मिसळून किंवा कोणत्याही डिशमध्ये मिसळून खाऊ शकता.

  • हृदय आणि दमाच्या रुग्णांना भांग अजिबात खाऊ नये.

  • अल्कोहोलमध्ये मिसळूनसुद्धा भांग घेऊ नये.

  • फास्टफूड आणि तेलकट पदार्थ खाणे टाळा

  • सिगारेट आणि इतर मादक पदार्थांचं सेवन करु नका. (Mahashivratri)

Mahashivratri 2023
Mahashivratri 2023: महाशिवरात्रीच्या दिवशी महादेवाला सिंदूर, हळद किंवा तुळशीची पानं का अर्पण करत नाहीत?
  • संत्री आणि इतर लिंबूवर्गीय फळे खल्ल्याने आरोग्याला हानी होते.

  • चहा आणि कॉफीचं सेवन करु नका

  • पेनकिलरचं सेवन करु नका. (Health)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com