
डॉ. बालाजी तांबे
महाशिवरात्र जवळ आली की आठवण होते थंडाई, भांग यांची, तसेच महाशिवरात्रीच्या आसपास बाग, शेती वगैरे ठिकाणी सर्पदर्शन होते, सर्पांची रतिक्रीडाही पाहायला मिळते. मात्र भगवान श्री शंकरांची समाधी आणि भांगेसारख्या पदार्थांच्या सेवनामुळे येणाऱ्या तंद्रा या दोन गोष्टी अगदीच वेगळ्या असतात
जसे श्री शंकरांनी समुद्रमंथनातून मिळालेल्या १४ रत्नांपैकी मानवकल्याणाची रत्ने इतरांना वाटून विष मात्र स्वतः स्वीकार करून पचवले आणि निरुपयोगी केले तसे आयुर्वेद शास्त्राने प्रत्येक वस्तूतील विषाची शुद्धी करण्याची प्रक्रिया दाखवून औषधे तयार केली. ज्या विषामुळे सर्व सृष्टीचा नाश होऊ शकला असता असे समुद्रमंथनातून निघालेले हलाहल भगवान श्री शंकरांनी प्राशन केले व ते आपल्या कंठात साठविले अशी कथा आपल्या सर्वांच्या परिचयाची आहे.