

Rising Malaria Cases in Summer
sakal
पूर्वी मलेरिया हा प्रामुख्याने पावसाळ्यात होणारा आजार मानला जात होता. मात्र आता परिस्थिती बदलत आहे. मुंबईसारख्या शहरांमध्ये उन्हाळ्यातही मलेरियाचे रुग्ण वाढताना दिसत आहेत. पावसाळ्याइतके प्रमाण नसले तरी ही वाढ चिंताजनक असून बदलत्या ट्रेंडकडे निर्देश करते.
या बदलामागे पर्यावरणातील बदल, जैविक अनुकूलता (adaptation) आणि झपाट्याने होणारे शहरीकरण ही प्रमुख कारणे आहेत.