

Type 5 Diabetes Gets Global Recognition
sakal
कुपोषण आणि अल्प पोषणामुळे होणाऱ्या मधुमेहाच्या ‘टाइप ५’ या प्रकाराला आंतरराष्ट्रीय स्तरावर अधिकृत मान्यता मिळाली आहे. या नव्या प्रकारावरील संशोधन वैद्यकीय नियतकालिक ‘लॅन्सेट’मध्ये प्रसिद्ध झाले असून, या शोधनिबंधात पुण्यातील केईएम रुग्णालयाचे ज्येष्ठ मधुमेहतज्ज्ञ डॉ. चित्तरंजन याज्ञिक यांचा सहभाग आहे. या प्रकारात ‘टाइप १’ किंवा ‘टाइप २’ मधुमेहासारखी लक्षणे नसतात, त्यामुळे चुकीचा उपचार घातक ठरू शकतो, असा इशारा तज्ज्ञांनी दिला आहे.