प्रश्र्न १- माझे वय ३५ वर्षे आहे. मला पित्ताचा प्रचंड त्रास आहे. उन्हाळ्यात तर डोके व मान सारखी दुखत असते, त्वचेवर रॅशही येतो. या त्रासासाठी काय करता येईल ते सांगावे.....
- प्रशांत पाटोळे, पनवेल
पित्ताची प्रकृती असणाऱ्यांना उन्हाळ्याचा व उष्णतेचा त्रास खूप प्रमाणात होतो. या लोकांना पित्त संतुलित ठेवण्याचा प्रयत्न सतत करावा लागतो. रोज साळीच्या लाह्यांचे पाणी, शहाळ्याचे पाणी नियमित घेणे पित्त कमी करण्यासाठी चांगले राहील. जमत असल्यास दुधात संतुलन गुलकंद स्पेशल घालून, ग्राइंडर किंवा रवीच्या साहाय्याने नीट घुसळून असे दूध नियमित घेण्याचा फायदा होऊ शकेल.
रोज न चुकता संतुलन पादाभ्यंग घृत लावून काशाच्या वाटीने पायाला पादाभ्यंग करावे, यामुळे हळूहळू त्रास कमी व्हायला मदत मिळेल. संतुलन पित्तशांती गोळ्या, संतुलन प्रवाळ पंचामृत मोतीयुक्त गोळ्या घेण्याचा फायदा होऊ शकेल. रोज रात्री झोपताना सॅनकूलसारखे चूर्ण नियमाने घेण्याचा काही दिवसांनी फायदा होऊ शकेल.