Thalassemia Awareness: विवाहापूर्वी थॅलेसेमिया-सिकलसेल तपासणी सक्तीची करण्याची मागणी; महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेचा इशारा

Sickle Cell Prevention: थॅलेसेमिया आणि सिकलसेलसारख्या अनुवंशिक आजारांचा प्रसार रोखण्यासाठी विवाहापूर्वी तपासणी सक्तीची करण्याची मागणी जोर धरत आहे.
Pre-Marital Screening for Thalassemia and Sickle Cell Urged to Prevent Genetic Disorders

Pre-Marital Screening for Thalassemia and Sickle Cell Urged to Prevent Genetic Disorders

sakal

Updated on

Sickle Cell Test Before Marriage: थॅलेसेमिया व सिकलसेल या आनुवंशिक रक्तविकारांचे वाढते प्रमाण लक्षात घेता विवाहपूर्व तपासणी कायदेशीररीत्या सक्तीची करण्याची मागणी महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेकडून करण्यात आली आहे.

सुमारे चार ते पाच टक्के लोकसंख्या या विकारांचे वाहक असल्याचा अंदाज व्यक्त केला जात असून, विवाह नोंदणीपूर्वी वधू-वरांची थैलेसेमिया व सिकलसेल तपासणी अनिवार्य करावी; अन्यथा विवाह प्रमाणपत्र देऊ नये, असा ठाम आग्रह त्यांनी धरण्यात आला आहे. सरकारने तातडीने निर्णय न घेतल्यास सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्याचा इशाराही देण्यात आला आहे. देशभरात अंदाजे १३ लाख सिकलसेल रुग्ण आणि सुमारे दोन लाख बॅलेसेमिया रुग्ण असल्याचे नमूद करण्यात आले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com