उपाशी राहणं चांगलं की वाईट
उपाशी राहणं चांगलं की वाईटEsakal

जर तुम्ही पूर्ण दिवसात काहीच खाल्लं नाही तर? Fasting शरीरासाठी फायद्याचं की नुकसानदायक?

अनेकजण डायटिंग करत असताना अनेकतास उपाशी राहतात. खास करून वजन कमी करण्यासाठी इंटरमिटेंट फास्टिंगसारखे पर्याय अनेकजण निवडतात. यामध्ये जवळपास १६-१८ तास काहीच खाल्लं जात नाही. मात्र, अशा प्रकारचं डायटिंग हे प्रत्येकासाठी फायदेशीर ठरत नाही

शरीराचं कार्य सुरळीत चालण्यासाठी तसचं शरीर निरोगी राहण्यासाठी शरीराला उर्जेची आणि सोबतच पोषक तत्वांची आवश्यकता असते. ही ऊर्जा आपल्याला रोजच्या आहारातून Diet मिळत असते. तर शरीराला पोषक तत्वांचा पुरवठा व्हावा यासाठी सकस आणि पौष्टिंक आहार घेणं गरजेचं असतं. Marathi Health Tips is long fasting helpful for health

जितका पौष्टिक आहार Healthy Diet तुम्ही घ्याल, तितकीच शरीराला ऊर्जा प्राप्त होईल आणि शरीर निरोगी बनेल. मात्र तुम्ही कधी विचार केला आहे का की संपूर्ण दिवसभर काहीच खाल्लं नाही म्हणजेच तुम्ही उपाशी राहिलात Fasting तर काय होईल? तुम्ही उपाशी राहिलात तर शरीराला ऊर्जा कुठून मिळेल आणि त्याचा शरीरावर काय परिणाम होईल असा प्रश्न तुम्हाला पडला आहे का?

तेव्हा आज आपण जाणून घेणार आहोत संपूर्ण दिवसभर उपाशी राहिल्यास त्याचा शरीरावर नेमका काय परिणाम होतो.

अनेकजण डायटिंग करत असताना अनेकतास उपाशी राहतात. खास करून वजन कमी करण्यासाठी इंटरमिटेंट फास्टिंगसारखे पर्याय अनेकजण निवडतात. यामध्ये जवळपास १६-१८ तास काहीच खाल्लं जात नाही. मात्र, अशा प्रकारचं डायटिंग हे प्रत्येकासाठी फायदेशीर ठरत नाही. तर अनेकांच्या आरोग्यावर त्याचे दुष्परिणाम होवू शकतात.

अनेक तास उपाशी राहिल्यास काय होतं?

जेव्हा आपण जेवतो किंवा एखादा पदार्थ खातो तेव्हा त्याची पचनक्रिया सुरू होते. सुरुवातीचे काही तास आपलं शरीर हे पदार्थ किंवा तुमचा आहार पचवण्याचं काम करत असतं. पचनानंतर निर्माण झालेल्या ग्लुकोजचं उर्जेमध्ये रुपांतर होतं. या उर्जेमुळे आपलं शरीर काही तास सक्रिय राहण्यास मदत होते.

मात्र जेव्हा तुम्ही साधारण ८ तास काहीच खात नाहीत तेव्हा ही ऊर्जा संपते आणि मग शरीर अतिरिक्त उर्जेसाठी शरीरातील फॅट्सचा उपयोग करण्यास सुरुवात करतं. जोवर तुम्ही पुढील अन्न खातं नाहीत तोवर ही प्रक्रिया सुरु राहते म्हणजेच उर्जेसाठी शरीर फॅट्सचा वापर करतं.

अर्थात तुम्ही ८ तासांहून अधिक काळ उपाशी राहिल्याने फॅट्स बर्न होतात. यामुळे वजन कमी होवू शकतं. मात्र वजन कमी करण्यासाठीचा या मार्ग खरचं शरीरासाठी किंवा आरोग्यासाठी फायदेशीर आहे का?

हे देखिल वाचा-

उपाशी राहणं चांगलं की वाईट
Fasting Rules: उपवासाच्या वेळी हे तीन पदार्थ खाणे टाळा!

या समस्या होवू शकतात निर्माण

जेव्हा तुमच्या शरीराला आहारातून ऊर्जा मिळते तेव्हा आहारातील पोषक तत्वांमुळे मेटाबोलाइजेशन म्हणजेच चयापचय होतं. तर जेव्हा शरीर फॅट्समधून ऊर्जा मिळवतं तेव्हा या स्थितीला केटोसिस म्हणतात. दीर्घकाळासाठी जर शरीर फॅट्समधून ऊर्जा मिळवत राहिलं तर त्याचे आरोग्यावर दुष्परिणाम होवू शकतात.

शिवाय उपाशी राहिल्याने फॅट्स बर्न होवून शरीराला ऊर्जा तर मिळते किंवा वजन कमी होऊ शकतं. मात्र यामुळे शरीराला आवश्यक पोषक तत्व मिळत नाहीत. यामुळे थकवा, अशक्तपणा किंवा चक्कर येणं अशा समस्या निर्माण होवू शकतात.

यासोबतच जर तुम्ही आठवड्यातून दोन किंवा त्याहून जास्त दिवस जर संपूर्ण दिवसभर उपाशी राहिलात तर त्यामुळे हृदयाच्या गतीवर परिणाम होवू शकतो आणि हायपोग्लायसीमियाचा धोका वाढू शकतो.

डाएट करताना ही घ्या काळजी

यासाठीच कोणताही डाएट प्लान घेताना सर्वप्रथम तुमच्या आरोग्याची आणि शरीराची तपासणी करणं गरजेचं आहे. तज्ञांच्या किंवा डॉक्टरांच्या सल्ल्यानेच कोणताही डाएट सुरु करा. डाएटमुळे त्याचा तुमच्या शरीरावर कोणताही नकारात्मक परिणाम होणार नाही याची काळजी घेणं गरजेचं आहे.

तसचं खास करून टाइप-1 किंवा टाइप-2 डाएबेटिस असलेल्या व्यक्तींनी संपूर्ण दिवसभर उपाशी राहणं टाळावं. त्याचसोबत गर्भवती महिला, एखादं ऑपरेश किंवा सर्जरी झालेल्या व्यक्ती, १० वर्षांखालील मुलं यांनी जास्त तास उपाशी राहणं कायम टाळावं.

हे देखिल वाचा-

उपाशी राहणं चांगलं की वाईट
विज्ञानातही आहे Fasting ला महत्व, श्रावणामध्ये उपवास करण्याचे काय आहेत फायदे?

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com