Illness Facts- Healthy Diet आणि व्यायाम करूनही सतत आजारी पडताय? मग हे असू शकतं कारण...

Illness Facts आपल्या शरीरामध्ये कान, मान, खांदे, मणका, इंस्टेस्टाइन आणि गुडघे असे अनेक अवयवय आहेत ज्यांचं नकळतपणे संतुलन बिघडलेलं असतं. हे संतुलन बिघडल्यामुळे अनेक आजारांना निमंत्रण मिळतं
Illness Facts- सतत आजारी पडण्याची कारणं
Illness Facts- सतत आजारी पडण्याची कारणंEsakal

Illness Facts अनेकजण निरोगी राहण्यासाठी चांगला आहार Balanced Diet आणि व्यायाम करण्यावर किंवा सक्रिय राहण्यावर भर देतात. नियमितपणे व्यायाम करून किंवा चांगला आहार घेऊनही मात्र यातील काहींना सतत आरोग्याच्या विविध तक्रारींचा सामना करावा लागतो.

यासाठी काही वेळेस स्ट्रक्चरल इम्बॅलन्स Imbalance म्हणजेच संरचनात्मक असंतुलन हे देखील एक कारण असू शकतं. Marathi Health Tips Know the reason behind continuous illness

स्ट्रक्चरल इम्बॅलन्स स्नायूंमध्ये Muscles आणि हाडांमध्ये वेदना निर्माण होवू शकतात. यामुळे अनेकदा उठणं-बसणं, चालणं तसचं रोजची काही साधारण काम करणं देखील कठिण होवून जातं.

आपल्या शरीरामध्ये कान, मान, खांदे, मणका, इंस्टेस्टाइन आणि गुडघे असे अनेक अवयवय आहेत ज्यांचं नकळतपणे संतुलन बिघडलेलं असतं. हे संतुलन बिघडल्यामुळे अनेक आजारांना निमंत्रण मिळतं. अनेकदा आपण अशा गोष्टींकडे दुर्लक्ष करून केवळ पेनकिलर खाण्यावर भर देत असतो.

स्ट्रक्चरल बॅलन्स बिघडण्याची कारणं

- जीममध्ये किंवा इतर ठिकाणी अचानक वजन उचलणं

- बसण्याची चुकीची पद्धत आणि तासनतास एकाच जागी बसून काम करणं.

- चुकीच्या पद्धतीने झोपणं

- जाड गादी किंवा स्पंजच्या सोफ्यावर बसल्याने किंवा पलंगावर झोपल्याने देखील स्ट्रक्चरल बॅलन्स बिघडू शकतो

शरीराचा स्ट्रक्चरल बॅलेन्स पुन्हा ठिक व्हावा किंवा या समस्येपासून दूर राहण्यासाठी योग्य आहारासोबतच नियमितपणे काही व्यायाम करणं तसचं योगा करणं गरजेचं आहे.

हे देखिल वाचा -

Illness Facts- सतत आजारी पडण्याची कारणं
Muscle Gain Tips: खाल्लेलं अंगाला लागेना, मग फक्त वर्कआऊट करून कसं चालेल? हे पण करा

मंत्रोच्चारांच्या मदतीने हृदय राहील निरोगी

एम्सने केलेल्या एका अभ्यासामध्ये मंत्रोच्चारांच्या मदतीने हृदयाचं आरोग्य चांगलं ठेवणं शक्य असल्याचं समोर आलं आहे. या अभ्यासामध्ये मंत्रोच्चारांमुळे हृदयाच्या ठोक्यांमध्ये चांगले बदल होत असल्याचं दिसून आलं. तसंच मंत्रोच्चारांमधून निर्माण होणाऱ्या कंपनांमुळे फुफ्फुसाचं कार्य मजबूत होत असल्याचं दिसून आलं.

स्ट्रक्चरल इम्बॅलन्स दूर करण्यासाठी उपाय

स्ट्रक्चरल इम्बॅलन्स दूर करण्यासाठी दररोज ३० मिनिटं पायी चालणं गरजेचं आहे. तसंच भुजंगासन, शलभासन, ताडासन, वृक्षासन, पादहस्तासन, चक्रासन आणि नौकासनासारखी योगासनं करावी.

यासोबतच आहारामध्ये दूध, हळद, शीलाजीत, अश्वगंधा आणि गुळवेलीच्या काढ्याचं सेवन देखील स्ट्रक्चरल इम्बॅलन्स दूर कऱण्यासाठी फायद्याचं ठरू शकतं.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com