दागिने

संस्कृतीमध्ये व्यवसाय, विवाह, संतती किंवा कुटुंब - सर्व काही केवळ मोक्ष आणि मुक्तीच्या दिशेने नेणारी साधने आहेत.
sadguru
sadgurusakal
Updated on

सद्‍गुरू : या संस्कृतीमध्ये व्यवसाय, विवाह, संतती किंवा कुटुंब - सर्व काही केवळ मोक्ष आणि मुक्तीच्या दिशेने नेणारी साधने आहेत. तुम्ही लग्न करता, मुलांचे संगोपन करता किंवा तुम्ही संन्यास घेता कारण यांचा उपयोग तुम्हाला तुमच्या मोक्षप्राप्तीसाठी एक साधन म्हणून करायचा असतो.

म्हणून वैवाहिक जीवनात, तुमचे पती किंवा तुमची पत्नी काय करत होते याला महत्त्व नव्हते. तुम्ही जसे आहात तोच एक अलौकिक अनुभव आहे. पूर्वी बऱ्याच स्त्रिया अशा प्रकारेच जगत होत्या कारण ही प्रक्रिया खूप शास्त्रीय होती आणि ती योग्य पद्धतीने पार पाडली जात होती.

बऱ्याचदा, आठ वर्षे वय असताना त्यांचे लग्न होत असे. चौदा किंवा पंधरा वर्षांचे होईपर्यंत ते एकमेकांना कधीच बघत नसत, पण मुलगी आणि मुलगा यांना भावनिक आणि मानसिकदृष्ट्या अशा पद्धतीने वाढवले जात असे की, जेव्हा ते भेटतील तेव्हा काहीतरी घडून येणार आहे. बालपणापासूनच त्यांच्या अंतर्मनात या नात्याची अनंत संभावना जोपासली जात असे. आजच्या तरुणांना जे वाटते तसे ते नव्हते. हे फक्त दोन शरीरे, मने किंवा भावनांचे जुळणे नव्हते - तर दोन जीवनांचे संपूर्ण एकात्म होणे होते.

जेव्हा दोघांचे लग्न व्हायचे तेव्हा स्त्रियांना लग्नानंतर जोडवी, नथ आणि इतर दागिने घालायला सांगितले जात असे, कारण विवाह हा इतका उच्च अनुभव मानला जात होता की, त्यामुळे ती देह सोडून जाण्याची शक्यता असायची. जर तुमच्या शरीराच्या काही विशिष्ट भागावर महत्त्वाच्या ठिकाणी धातू असेल, तर तुम्ही अचानक शरीर सोडून जाणार नाही.

अगदी इथेसुद्धा, जेव्हा आम्ही साधकांना प्रखर स्वरूपाची साधना करायला सांगतो, तेव्हा आम्ही त्यांना तांब्याची अंगठी भेट म्हणून देतो. आम्ही त्यांना त्याचे कारण सांगत नाही; परंतु माझ्या परवानगीशिवाय ते ती काढू शकत नाहीत. मुळात, आध्यात्मिक साधना ही तुमच्या जीवनऊर्जेच्या पातळीला सर्वोच्च बिंदूपर्यंत नेण्याचा प्रयत्न असतो. हे असे आहे, की जेव्हा विद्युत दाब (व्होल्टेज) जास्त असतो, तेव्हा दिवे जास्त प्रकाशमान होतात.

जर तुमचा विद्युत दाब कमी असेल, तर प्रकाश मंद असेल आणि तुमची जागरूकता आणि आकलन देखील मंद असेल; मग तुम्हाला केवळ उदरनिर्वाहाची प्रक्रिया कळेल. आता आध्यात्मिक साधनेद्वारे ती तुम्हाला वाढवायची असते. जेव्हा तुम्ही ती एका विशिष्ट मर्यादेपलीकडे वाढवता, जेव्हा लोक अतिशय प्रखर साधना करतात, तेव्हा ते त्यांच्या देहातून अपघाताने बाहेर पडण्याची शक्यता असते.

परंतु शरीरावर जर धातू असेल, तर असे घडणार नाही. धातू नेहमी या प्रक्रियेला खंडित करतो कारण तो तुमचा देहाशी असलेला संबंध दृढ करतो. विशेषतः तांबे. सोनेसुद्धा काही प्रमाणात हेच कार्य करते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com