
मंचर : पुणे नाशिक राष्ट्रीय महामार्गाच्या पूर्वेला प पारगाव _पेठ(ता. आंबेगाव) येथे असलेल्या किसान कनेक्ट शेतीमालाच्या मॉलला गुरुवारी संध्याकाळी सहा वाजता आग लागली. आगीमध्ये दहा हजार स्क्वेअर फुट उभारलेले पत्र्याचे शेड व शेतकऱ्यांकडून जमा केलेला तरकारी, भाजीपाला , आंबे, फळे असा एकूण ४० टनाहून अधिकशेतीमाल जळून गेला आहे. पाण्याचे टँकरअग्निशामक दल स्थानिक नागरिक यांच्या मदतीने रात्री साडेसात वाजता आग शमविण्यात यश आले आहे. एक कोटी हून अधिक रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.