

Matrutva Ayurved Care
Sakal
डॉ. मालविका तांबे
पुरुष आणि स्त्री या दोघांमध्ये जास्त महत्त्व कोणाचं आहे, तर ते निश्चितच स्त्रीला दिलं जातं. कारण निसर्गाने तिला आई होण्याची, पुढच्या पिढीला जन्म देण्याची जी सृजनात्मक क्षमता दिलेली आहे, ही क्षमता एक गोड जबाबदारी म्हणून बहुतांशी स्त्रिया स्वीकारत असतात. ज्याप्रमाणे स्त्रीला आई होण्याचा आनंद असतो, अभिमान असतो; तसंच मुलांनासुद्धा त्यांची आई एक छत्रछाया, एक आधार म्हणून अगदी लहानपणापासून वाटत असते।
नास्ति मातृसमा छाया नास्ति मातृसमा गति:।
नास्ति मातृसमं त्राणं नास्ति मातृसमा प्रिया॥
अर्थात आईसारखं आधार देणारं, संरक्षण करणारं कोणीही नसतं। आईसारखं आश्रय देणारं कोणी नाही आणि तसंच आईसारखं प्रेम करणारे व प्रेम असणारेसुद्धा दुसरं कोणीही आपल्या आयुष्यात नाही।