India’s Mental Health Warning: मानसिक आरोग्यस्थितीचे चित्र चिंताजनक; ३५ वर्षांखालील व्यक्तींना ६० टक्के मानसिक आजार

Alarming Mental Health Statistics: मानसिक आरोग्यस्थिती गंभीर होत असून ३५ वर्षांखालील व्यक्तींमध्ये तब्बल ६० टक्के मानसिक आजार आढळत असल्याचे धक्कादायक चित्र समोर आले आहे.
Mental Health Report India 2025

Mental health condition in India is alarming as 60% of mental disorders.

sakal

Updated on

Mental Health Crisis: भारताच्या मानसिक आरोग्यस्थितीचे चित्र अत्यंत चिंताजनक असून, देशातील ६० टक्के मानसिक आजार ३५ वर्षांखालील व्यक्तींना झाल्याचे उघड झाले आहे. 'इंडियन सायकियाट्रिक सोसायटी'च्या ७७व्या वार्षिक राष्ट्रीय परिषदेच्या निमित्ताने याबाबतचे निष्कर्ष मांडण्यात आले आहेत.

उच्चस्तरीय वैज्ञानिक चर्चेदरम्यान सादर केलेल्या आकडेवारीनुसार, भारतातील मानसिक आजार आता आयुष्याच्या उत्तरार्धातील कालमयदित मर्यादित राहिलेले नाहीत, तर ते किशोरवयीन, तरुण नागरिकांना त्याचा त्रास होत आहे. चार दिवसांची ही राष्ट्रीय परिषद २८ ते ३१ जानेवारीदरम्यान दिल्लीतील यशोभूमी येथे होत असून, देशभरातील हजारो मानसोपचारतज्ज्ञ, चिकित्सक, संशोधक, अभ्यासक यात सहभागी झाले आहेत. तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, मानसिक आजार वयाच्या १९ ते २० व्या वर्षापासून सुरू होतात.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com