

भूतकाळ : एक शिक्षक!
Sakal
डॉ. सुवर्णा बोबडे - समुपदेशक व मानसशास्त्रज्ञ
‘ती घटना खूप वर्षांपूर्वीची आहे... पण आठवली की अजूनही मन अस्वस्थ होतं. जणू जखम अजूनही ओलीच आहे.’ अशी वाक्ये अनेकांकडून ऐकायला मिळतात. किंवा काही लोक म्हणतात, ‘मी त्या व्यक्तीला/ घटनेला विसरलो आहे. माफ केलं आहे.’