Eyes Problem
sakal
प्रश्न - मी पंचेचाळीस वर्षांची आहे. पतीचे अचानक निधन झाल्यामुळे मला नैराश्याचा त्रास सुरू झाला व त्याच दरम्यान पाळीही गेली. आता या गोष्टीला चार वर्ष झाली आहेत. मी या नैराश्याकरिता उपचारही घेतले आणि त्यामुळे वजनही वाढले. पती गेल्याच्या धक्क्याने माझे संपूर्ण केसही पांढरे झाले. आता मी त्या सगळ्यातून सावरले आहे. मला कोणत्याही गोळ्या घ्याव्या लागत नाहीत; परंतु गेल्या दोन महिन्यांपासून मला परत पाळी सुरू झालेली आहे. स्त्री तज्ज्ञांनी तपासण्या केल्या. त्यात काहीच दोष सापडला नाही. मात्र, त्यांनी सांगितले की, अशी पाळी येणे योग्य नाही. पुन्हा नैराश्य येणार का, अशी अनामिक भीती वाटते. कृपया मार्गदर्शन करावे.
- शीतल दशपुत्रे, रत्नागिरी.
उत्तर - मानसिक स्वास्थ्य आणि स्त्रीच्या शरीरातल्या हार्मोन्स संतुलनचा खूप जवळचा संबंध असतो. त्यामुळे कुठलाही मानसिक ताण, नैराश्य या सगळ्याचा पाळीवर नकारात्मक प्रभाव पडतो. कदाचित पतीच्या निधनामुळे ताण आला असावा त्यातूनच पाळी थांबली असावी. शरीरात थोडे चांगले बदल झाल्यावर पाळी परत सुरू झाली असेल. सगळ्या तपासण्यांचा अहवाल व्यवस्थित असेल तर कुठल्याही प्रकारची चिंता करू नये. उलट स्त्री संतुलन करता प्रयत्न करावे. याकरता रोज संतुलनच्या फेमिसॅन तेलाचा पिचू वापरणे, आठवड्यातून दोन तीनदा तरी संतुलनचा शक्ती धूप करणे व रोज नियमाने न चुकता श्रीगुरू डॉक्टर बालाजी तांबे यांचं स्त्री संतुलन संगीत ऐकणे मदत करू शकेल. रोज अनुलोम विलोम करणे, प्राणायाम करणे, सूर्यनमस्कार, संतुलन क्रियायोग करणे मदत करू शकेल. तसेच तज्ज्ञ वैद्यांकडून किंवा संतुलनमध्ये शास्त्रोक्त पंचकर्मामध्ये शिरोधारा नस्य करून घेण्याचाही फायदा होईल. तसेच रोज संतुलनचे रिलॅक्स सिरप, सॅण्ड ब्रामी गोळ्या व पादाभ्यंग किटने पादाभ्यंग करणंसुद्धा मदत करू शकेल.