‘स्क्रीन टाइम’ मेंदूसाठी हानिकारक; मोबाईलच्या अतिवापरा टाळा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Latest Health News

‘स्क्रीन टाइम’ मेंदूसाठी हानिकारक; मोबाईलच्या अतिवापरा टाळा

नागपूर - मेंदू विश्वाचे प्रतिनिधित्व करतो. मानवी मेंदूमध्ये १०० अब्ज न्यूरॉन्स असतात तर १० ट्रिलियन कनेक्शन्स (सायनॅप्स) असतात. यामुळेच विश्वातील सर्व कारभाराचे नियंत्रण मेंदू करतो. मेंदू हा मानवी शरीरातील सर्वात आश्चर्यकारक आणि गुंतागुंतीचा अवयव आहे. मेंदूचे आरोग्य जपण्यासाठी रक्तदाब, साखर, वजन, ताण यावर नियंत्रण ठेवणे अत्यंत आवश्यक आहे. अल्कोहोल, तंबाखू, धूम्रपानापासून तर ‘स्क्रीन टाइम’देखील मेंदूच्या आरोग्यासाठी हानिकारक आहे, असा सूर मेंदूरोग तज्ज्ञांच्या चर्चेतून पुढे आला.

जागतिक आरोग्य संघटना संबंधित ‘वर्ल्ड हेल्थ असेंब्ली’ने ‘इंटरसेक्टोरल ग्लोबल अॅक्शन प्लॅन’ स्वीकारला आहे. मेंदूच्या आरोग्याला चालना देताना आणि मेंदूच्या विकारांना प्रतिबंध करताना मेंदूच्या आरोग्यास प्रोत्साहन देणे हा अत्यंत महत्त्वाचा भाग या कृती आराखड्याचा आहे. इपिलेप्सी आणि इतर न्यूरोलॉजिकल डिसऑर्डर २०२२-२३ (आयजीएपी )नुसार हा ॲक्शन प्लॅन आहे. या ॲक्शन प्लॅनमध्ये प्रत्येक देशातील राष्ट्रीय आरोग्य धोरणांमध्ये मेंदू आरोग्य व्यवस्थापनाचा कार्यक्रम अधोरेखित असून वेळेवर निदान, उपचार आणि काळजीची हमी त्यात असावी, असे स्पष्टपणे नमुद केले आहे.

रविवारी नागपुरात वॉक फॉर युवर ब्रेन

‘इंडियन अॅकेडमी ऑफ न्यूरोलॉजी’तर्फे मेंदूविकारावर २२ जुलै रोजी संध्याकाळी ६.३० वाजता चर्चा असून जगभरातील डॉ. वुल्फगँग ग्रिसोल्ड, डॉ. विल्यम कॅरोल, डॉ. स्टीव्हन लुईस, डॉ. टिसा विजेरत्ने, डॉ. डेव्हिड डॉडिक, डॉ. वांग शांग, डॉ. निर्मल सूर्या, डॉ. जॉय देसाई, डॉ. सूर्यनारायण शर्मा आणि डॉ. सुमीत सिंग हे यात सहभागी होणार आहेत. तर शनिवारी रविवारी (ता.२४) सकाळी ७ वाजता मेंदूच्या आरोग्यासाठी शारीरिक हालचालींचे महत्त्व अधोरेखित करण्यासाठी डॉ. आंबेडकर महाविद्यालयाच्या क्रीडा अकादमीच्या मैदानावर रॅलीद्वारे वॉक फॉर युवर ब्रेनचे आयोजन करण्यात आले आहे.

मोबाईलच्या अतिवापराचे दुष्परिणाम

 • झोप उडणे, झोप न येणे

 • डोळे दुखणे, पाणी येणे

 • डोके दुखणे, चिडचिड करणे

 • भूक न लागणे

 • मोबाईल न दिसल्यास बेचैन होणे

 • स्मरणशक्ती कमजोर होणे

 • अभ्यासात मन न लागणे

 • एकाग्रता, शिकण्याची क्षमता मंदावणे

 • शुक्राणू आजारी होणे, पुढे मुलबाळ न होणे

 • मानसिक रोगी होणे

 • समाजात न मिसळणे, एकलकोंडा स्वभाव होणे

 • कानाजवळ मुंग्या आल्याची भावना होणे

 • थकवा, रक्तदाब, अशक्तपणा, हृदयात धडधड वाढणे

 • डिप्रेसिव्ह सिंड्रोम निर्माण होऊ शकतो

 • मानेचे दुखणे

 • सकाळी उठताच मोबाईल पाहिल्यास डोळ्यांना इजा होण्याचा धोका

मेंदूला निरोगी ठेवण्यासाठी नियमित व्यायाम, योग्य झोप, पुरेसे पोषण, सामाजिक व्यस्तता,शुद्ध हवा आणि पाणी आणि जीवनशैलीत सकारात्मक बदल करण्याची आवश्यकता आहे.

-डॉ. चंद्रशेखर मेश्राम, विश्वस्त -डब्ल्यूएफएन.

रस्त्यावरील अपघातामध्ये मेंदूला इजा होण्याचे प्रमाण ६० टक्के आहे. तसेच उंचवरून पडल्याने मेंदूला इजा होण्याचे प्रमाण २५ टक्के आहे. १० टक्के मेंदूच्या दुखापतीसाठी भांडण व हाणामारी कारणीभूत आहे. याशिवाय १० ते १५ टक्के इजांमध्ये मद्यपान कारणीभूत ठरते. यावर सतर्कता व प्रतिबंधात्मक उपाय हा मार्ग आहे.

-डॉ. अक्षय पाटील, मेंदूरोग शल्यचिकित्सक, नागपूर.

Web Title: Mobile Phones Overuse Side Effects Screen Time Harmful To Brain Latest Health News

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top