मोकळे व्हा : संसारातील अनुत्तरित प्रश्‍न

लग्नानंतर समोर आलेल्या भूतकाळातील नातेसंबंधांमुळे ढासळलेला विश्‍वास, फसवणुकीची भावना आणि नाते टिकवण्याची ओढ यांत अडकलेल्या नवदांपत्याला समुपदेशकाचा संयम, संवाद व वास्तववादी विचारांचा सल्ला
Relationship Psychology: Deciphering the Impact of Rebound Dynamics on Marital Trust

Relationship Psychology: Deciphering the Impact of Rebound Dynamics on Marital Trust

Sakal

Updated on

डॉ. स्मिता प्रकाश जोशी, समुपदेशक

प्रश्‍न : माझे लग्न होऊन केवळ १५ दिवस झाले आहेत. लग्नापूर्वी आमच्यात अनेक विषयांवर चर्चा झाली होती व त्या वेळी मी माझ्या पत्नीला तिच्या पूर्वीच्या नातेसंबंधांबद्दल स्पष्टपणे विचारले होते. तिने काही माहिती दिली व मी तिच्यावर पूर्ण विश्‍वास ठेवला. लग्नानंतर एकदा तिचा फोन हाताळताना मला तिचे दुसऱ्या व्यक्तीबरोबरचे जुने चॅट्स दिसले. विचारल्यावर तिने सांगितले, की तो तिच्या भूतकाळातील संबंध होता. पण लग्नापूर्वी तिने मला सांगितलेल्या व्यक्तीपेक्षा ही व्यक्ती वेगळी होती. तिने सांगितले, की पहिले ‘ब्रेकअप’ झाल्यानंतर तिची ती एक ‘रिबाउंड रिलेशनशिप’ होती. ही गोष्ट समजल्यानंतर माझ्या मनात गोंधळ निर्माण झाला आहे. मी तिच्यावर मनापासून प्रेम करतो आणि हे लग्न मोडावे असे मला वाटत नाही. पण फसवणूक झाल्याची भावना आणि नाते टिकविण्याची इच्छा या दोन गोष्टींत मी अडकलो आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com