Monsoon Body Detox : पावसाळ्यात शरीर डिटॉक्स करायचे आहे? मग, 'या' हेल्दी ड्रिंक्सचा आहारात करा समावेश

Monsoon Body Detox : बिघडलेल्या जीवनशैलीमुळे शरीरात विषारी घटक जमा होऊ लागतात. त्यामुळे, वेळोवेळी शरीर डिटॉक्स करणे खूप महत्वाचे आहे.
Monsoon Body Detox
Monsoon Body Detoxesakal
Updated on

Monsoon Body Detox : सध्याचे आपले धावपळीचे जीवन, बिघडलेला आहार, खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयी अन् व्यायामाचा अभाव इत्यादी कारणांमुळे आरोग्याच्या समस्या निर्माण होत आहेत.

या बिघडलेल्या जीवनशैलीमुळे शरीरात विषारी घटक जमा होऊ लागतात. त्यामुळे, वेळोवेळी आपले शरीर डिटॉक्स करणे खूप महत्वाचे आहे. शरीराचे डिटॉक्सिफिकेशन केल्याने आपले यकृत निरोगी ठेवण्यास मदत होते.

शरीराचे डिटॉक्सिफिकेशन केल्याने शरीर आतून स्वच्छ होते आणि आपली रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होते. शिवाय, त्वचा देखील चमकदार दिसते. पावसाळ्यात अनेक संसर्गजन्य आजारांचा धोका संभवतो. त्यामुळे, या दिवसांमध्ये आपण आपल्या आरोग्याची खास काळजी घेणे गरजेचे आहे.

त्यामुळे, या दिवसांमध्ये तुम्ही काही हेल्दी डिटॉक्स ड्रिंक्सचा आहारात समावेश करणे, महत्वाचे आहे. या हेल्दी ड्रिंक्समुळे तुमच्या शरीरातील विषारी घटक निघून जाण्यास मदत होऊ शकते आणि विविध आजारांपासून तुमचे संरक्षण होईल. कोणते आहेत हे हेल्दी डिटॉक्स ड्रिंक्स? चला तर मग जाणून घेऊयात.

Monsoon Body Detox
Healthy Drinks for Joint Pain : सांधेदुखीमुळे हालचाल करणे कठीण झालेय? मग, आहारात 'या' हेल्दी ड्रिंक्सचा करा समावेश

हर्बल टी

चहा प्यायला अनेकांना आवडतो. पावसाळ्यात सामान्य दुधाचा चहा पिण्याऐवजी तुम्ही हर्बल चहा देखील पिऊ शकता. हर्बल चहामध्ये तुम्ही पेपरमिंट चहा, कॅमोमाईल चहा इत्यादींचा समावेश करू शकता.

हर्बल चहामध्ये विपुल प्रमाणात अँटी-ऑक्सिडंट्सचा समावेश असतो. जे शरीराला डिटॉक्स करण्यास मदत करतात. हर्बल टी प्यायल्याने पचनक्षमता सुधारते आणि चांगली झोप येण्यास मदत होते. त्यामुळे, बॉडी डिटॉक्ससाठी हर्बल टी फायदेशीर आहे.

बीट आणि आल्याचा रस

बीटरूट आणि आल्याचा रस हे दोन्ही प्रमुख घटक आपल्या शरीराला डिटॉक्स करण्यास मदत करतात. बीटाचा रस आपल्या यकृतातील विषारी पदार्थ साफ करण्याचे काम करते आणि आल्याचा रस शरीरातील जळजळ कमी करण्यास मदत करते.

बीटामध्ये असलेले अँटी-ऑक्सिडंट्स आपल्या शरीराची रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करण्यास मदत करतात. त्यामुळे, बीटरूट आणि आल्याचे हे हेल्दी ड्रिंक रोज सकाळी अवश्य प्या. हे हेल्दी ड्रिंक प्यायल्याने शरीर उत्तम प्रकारे डिटॉक्स होते.

आलं आणि लिंबाचा चहा

पावसाळ्यात चहा प्यायला अनेकांना आवडते. थंडी आणि पावसाच्या या अनोख्या वातावरणात चहा पिण्याचा आनंद काही वेगळाच असतो. अशा स्थितीमध्ये तुम्ही लिंबू आणि आल्याचा चहा पिऊ शकता. हा चहा पिणे आरोग्यासाठी फायदेशीर ठरू शकतो तसेच, यामुळे, बॉडी डिटॉक्सिफिकेशन चांगल्या प्रकारे होते.

आल्यामध्ये दाहक-विरोधी गुणधर्म असतात. जे शरीरातील जळजळ कमी करतात आणि आपली रोगप्रतिकारकशक्ती मजबूत करतात. लिंबू व्हिटॅमिन सी चा उत्कृष्ट स्त्रोत आहे. लिंबामुळे ऑक्सिडेटिव्ह ताण कमी होतो. लिंबाचा अन् आल्याचा चहा प्यायल्याने शरीर डिटॉक्स होण्यास मदत होते.

डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींची पुष्टी करत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.