

Cracked Heels In Rainy Season?
esakal
Walking Hurts In Monsoon?: बदलत्या हवामानात किंवा शरीरातील पाण्याच्या कमतरतेमुळे टाचांना भेगा पडणे ही सामान्य पण तितकीच त्रासदायक समस्या आहे. अनेकदा महिला आणि पुरुषांमध्ये वर्षभर हा त्रास पाहायला मिळतो. सुरुवातीला याकडे दुर्लक्ष केले जाते, पण जेव्हा या भेगा खोल होतात, तेव्हा असह्य वेदना होतात, चालणे-उभे राहणे कठीण होते आणि काही वेळा रक्तस्त्रावही सुरू होतो. तज्ज्ञांच्या मते, टाचांना भेगा पडणे हा फक्त पायांच्या सौंदर्याचा प्रश्न नसून, ते शरीरातील काही गंभीर आजारांचे किंवा पोषक तत्वांच्या कमतरतेचे संकेत असू शकतात.