

monsoon skin care ayurveda vata dosha balance health tips dr malavika tambe
Sakal
डॉ. मालविका तांबे
पावसाळा सुरू झाला की हवेतील आर्द्रता वाढते. सूर्याच्या उष्णतेचा अभाव आणि कोंदट वातावरणामुळे बुरशी (फंगस), कृमी आणि जंतूंना पोषक वातावरण मिळते. परिणामी, या ऋतूत त्वचेचे विविध संसर्ग आणि ॲलर्जीच्या समस्या डोकं वर काढतात. आयुर्वेद शास्त्रानुसार, या काळात शरीरातील ‘वातदोषाचे’ असंतुलन होते, ज्यामुळे त्वचा कोरडी, निस्तेज आणि खरखरीत होऊ लागते. बाहेरील हवामान उष्ण नसल्याने हा कोरडेपणा चटकन लक्षात येत नाही आणि त्वचेकडे दुर्लक्ष होते. पावसाळ्यात त्वचेचे आरोग्य आणि सौंदर्य अबाधित ठेवण्यासाठी काही सोप्या आणि प्रभावी आयुर्वेदिक सवयी अंगीकारणे गरजेचे आहे.