थोडक्यात: जोरदार पावसामुळे सर्दी, ताप आणि विषाणूजन्य आजारांचे प्रमाण वाढले आहे.आजारी मुलांना शाळेत पाठवू नका कारण संसर्गाचा धोका असतो.कोमट पाणी प्यावे, गरम सूप घ्यावे आणि बाहेरचे तेलकट पदार्थ टाळावे..Monsoon Viral Diseases Prevention Tips: पावसाळा आला की अनेकांना सर्दी, ताप आणि विविध विषाणूजन्य आजारांची तक्रार होते. राज्यभरातील अनेक भागांमध्ये मागील काही दिवसांपासून जोरदार पावसामुळे या आजारांचा प्रचंड वाढ झाल्याचे दिसून येते..रुग्णालयातील ५० टक्के रुग्ण हेच आजार घेऊन दाखल होत आहेत. त्यामुळे या हंगामात योग्य आहार-विहार करून स्वतःची आणि आपल्या कुटुंबाची काळजी घेणे अत्यंत गरजेचे आहे..Maharashtra Police Bharti 2025: पोलीस भरतीची तयारी कुठून आणि कशी करायची? जाणून घ्या महत्त्वाचे विषय आणि अभ्यासपद्धती.पावसाळ्यात आजार वाढण्यामागील कारणेपावसाळ्यामुळे वातावरण दमट आणि थंड होते, ज्यामुळे विषाणूंचा प्रसार वेगाने होतो. सूर्यप्रकाशाचा अभाव आणि वाढलेला गारवा शरीराची रोगप्रतिकारक क्षमता कमी करतो. परिणामी, श्वसनसंस्थेचे आजार जसे सर्दी, खोकला, ताप आणि अंगदुखी यांचा वाढता प्रादुर्भाव पाहायला मिळतो..मुलांची काळजी विशेष आवश्यकडॉ. स्मित जानराव, मेडिसीन विभाग, वैशंपायन वैद्यकीय रुग्णालय, सोलापूर म्हणतात, पावसाळ्यात सूर्यप्रकाश कमी होणे आणि दमट वातावरण विषाणूजन्य आजार वाढवते. मुलांमध्ये या आजारांचा प्रादुर्भाव जास्त असल्याने आजारी मुलांना शाळेत पाठवू नये. वर्गात गेल्यानंतर त्यांचा संसर्ग शेजारी बसलेल्या मुलांना होण्याची शक्यता असते. मुलांच्या आहारात पोषणयुक्त आणि सहज पचणारे पदार्थ समाविष्ट करावेत..Weekend Getaways: मुंबई-पुण्याजवळची निसर्ग सौंदर्यानं नटलेली 5 ठिकाणं; 3 दिवसांच्या सुट्टीसाठी परफेक्ट!.पावसाळी काळजीसाठी काही सोपे उपायसकाळी कोमट पाणी प्यावे, जे शरीरातील विषारी द्रव्ये बाहेर काढते.बाहेर जाताना कान-नाक-तोंड व्यवस्थित झाकण्यासाठी स्कार्फ किंवा रुमाल वापरावा.तेलकट, तळलेले आणि जास्त मसालेदार अन्न टाळावे.तुळस, हळद, दालचिनी आणि सुंठ यांचा काढा नियमितपणे घेणे फायदेशीर.गरम सूप आणि फळांमध्ये हलके-फुलके पदार्थ खाणे गरजेचे आहे.थंड पदार्थ, बंड पदार्थ टाळावेत..FAQs1. पावसाळ्यात विषाणूजन्य आजार कसे वाढतात? (How do viral diseases increase during monsoon?)पावसाळ्यात दमट वातावरण, कमी सूर्यप्रकाश आणि वाढलेले संसर्गामुळे विषाणूजन्य आजार वाढतात.2. आजारी मुलांना शाळेत का पाठवू नये? (Why shouldn't sick children be sent to school?)आजारी मुलांमुळे विषाणू वर्गातील इतर मुलांना संसर्ग होण्याचा धोका वाढतो, म्हणून बरे होईपर्यंत ते घरात राहावे.3. पावसाळ्यात आरोग्यसाठी कोणती काळजी घ्यावी? (What precautions should be taken for health during monsoon?)कोमट पाणी प्यावे, तुळस, हळद यांचा वापर करावा, गरम सूप घ्यावे आणि तेलकट पदार्थ टाळावेत.4. विषाणूजन्य आजारांवर तातडीने काय उपाय करावेत? (What immediate measures should be taken against viral diseases?)लक्षणे दिसल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या, गरम पाणी प्या, विश्रांती घ्या आणि आहारात योग्य बदल करा. .सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.