Mood Swing Disorder : 'कभी खुशी तो कभी नाराजी' हे मूड स्विंग नसून असू शकतं गंभीर आजाराचं लक्षण... | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Mood Swing Disorder

Mood Swing Disorder : 'कभी खुशी तो कभी नाराजी' हे मूड स्विंग नसून असू शकतं गंभीर आजाराचं लक्षण...

Mood Swing Disorder : आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या घटनांमुळे मनःस्थितीत बदल होणे स्वाभाविक आहे. दैनंदिन जीवनात घडणाऱ्या वेगवेगळ्या गोष्टींमुळे कधी कधी आपल्याला राग येतो तर कधी आनंद होतो. पण मात्र कारण नसताना तुमच्या मूडमध्ये बदल होत असेल तर ते सामान्य नाही. कारण हा सायक्लोथायमिक डिसऑर्डर असू शकतो. सायक्लोथायमिक डिसऑर्डरने ग्रस्त व्यक्ती एका क्षणी खूप आनंदी आणि दुसऱ्या क्षणी खूप दुःखी असू शकतात. हा विकार एक प्रकारे तुमच्या मूड स्विंगला जबाबदार आहे.

नॅशनल हेल्थ सर्व्हिस (NHS) नुसार, बहुतेक लोकांची लक्षणे इतकी सामान्य असतात की ते मानसिक आरोग्य उपचार घेण्याचा विचार करत नाहीत. त्यांना वाटते की ही एक सामान्य समस्या आहे, ज्याला उपचारांची आवश्यकता नाही.

मात्र प्रत्येक आजाराप्रमाणे या विकारावरही उपचार करणे आवश्यक आहे. कारण त्याचा तुमच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक जीवनावर वाईट परिणाम होतो. जरी सायक्लोथिमिया असलेल्या रुग्णांची अधिकृत संख्या नाही, परंतु तरीही असे मानले जाते की अनेक लोक या समस्येने ग्रस्त आहेत. सायक्लोथिमिया हा एक बायपोलर डिसॉर्डरचा भाग मानला जातो. याला सामान्य बायपोलर मानलं जातं .

लक्षणे

जर तुम्हाला सायक्लोथिमियाचा त्रास होत असेल तर काही वेळा तुम्हाला खूप वाईट वाटेल, तर इतर वेळी तुम्ही खूप आनंदी आणि उत्साहित असाल. याला कधीकधी हायपोमॅनिया म्हणतात. हायपोमॅनिक अवस्थेत, तुम्हाला जास्त झोपण्याची गरज भासणार नाही. तुमच्यात खूप ऊर्जा आहे असे तुम्हाला वाटेल. खराब मनःस्थिती ही उदासीनता मानली जाण्याइतकी गंभीर मानली जात नाही. पण या दरम्यान तुम्हाला खूप सुस्त वाटू शकते.

बायपोलर डिसऑर्डर म्हणजे काय?

बायपोलर डिसऑर्डर ही देखील एक मानसिक आरोग्य समस्या आहे, ज्यामुळे तुमचा मूड बदलतो. तर सायक्लोथिमिया हा बायपोलर विकाराचा एक प्रकार आहे. ही स्थिती इतर काही प्रकारांपेक्षा कमी गंभीर मानली जाते. जर एखाद्याला बायपोलर १ किंवा २ विकार असेल, तर त्यांची मनःस्थिती सायक्लोथिमिया असलेल्या लोकांपेक्षा काही प्रमाणात वेगळी असू असते.

सायक्लोथिमियाची कारणे आणि उपचार

सायक्लोथिमियाची कारणे अद्यापही अज्ञात (अस्पष्टच) आहेत. अनेकदा त्याचा आनुवंशिकतेशी संबंध समजला जातो. या समस्येवर कोणताही अचूक उपचार नाही, परंतु असे अनेक उपचार आहेत जे सायक्लोथिमियाच्या समस्येपासून मुक्त होण्यास उपयुक्त ठरू शकतात.

उपचारांमध्ये सहसा औषधोपचार आणि काही प्रकारची बोलण्याची थेरपी असते. सायक्लोथिमियावरील सर्व उपचारांचा उद्देश केवळ लक्षणे कमी करणे नाही तर सायक्लोथिमियाला बायपोलर १ किंवा बायपोलर २ विकारात विकसित होण्यापासून रोखणे देखील आहे.

टॅग्स :Diseasehealth