Morning Running Tips: शरीराला निरोगी ठेवण्यासाठी अनेक लोक व्यायाम करतात. तसेच धावायलाला देखील जातात. नियमितपणे धावल्याने शरीर लवचिक आणि तंदुरूस्त राहते. पण तुम्ही पहिल्यांदाच धावत असाल तर पुढील गोष्टी लक्षात ठेवा. .धावण्यापूर्वी या गोष्टी लक्षात ठेवावॉर्मअप कराएखाद्याने अचानक धावायला सुरूवात करू नका. यामुळे तुम्हाला त्रास होऊ शकतो. धावण्यापूर्वी शरीराला वॉर्मअप करणे गरजेचे आहे. कारण अचानक धावल्याने पायाला दुखापत होऊ शकते आणि स्नायू क्रॅम्प होऊ शकतात. यामुळे हाडांना दुखापत आणि वेदना होऊ शकतात. हे टाळण्यासाठी धावण्यापूर्वी वॉर्म अप करा. .Merry Christmas 2024 : बच्चे कंपनींचा ख्रिसमस बनवा स्पेशल; द्या 'हे' 5 सुंदर आणि फायदेशीर गिफ्ट्स.जास्त खाणेधावायला आणि जॉगिंग करण्यापूर्वी जास्त खाणे टाळावे. त्यामुळे धावताना पचनक्रिया मंदावते आणि ते सामान्यपणे वागू शकत नाही. व्यायामादरम्यान रक्त प्रवाह सुरळित राहीला पाहिजे..जास्त पाणी पिणे किंवा न पिणेधावण्यापूर्वी एक लिटर पाणी पिणे किंवा ते अजिबात न पिणे चुकीचे आहे. धावण्याआधी थोडे पाणी पिऊ शकता आणि स्वतःला हायड्रेटेड ठेवा..बाथरूममध्ये न जाणेअनेकदा लोक धावणे किंवा जॉगिंगला जाण्यापूर्वी पोट साफ करत नाहीत. बाथरूमला जाणे टाळतात. पण असे करू नका तुमच्यासाठी सर्वात वाईट परिस्थिती निर्माण होऊ शकते. यामुळे तुम्हाला अस्वस्थताही जाणवेल..शरीराची काळजी न घेणेधावताना तुमचे शरीर तुम्हाला साथ देत नसेल तर जबरदस्तीने धावू नका. शक्य तितके धावा. जर तुम्ही असे केले नाही तर तुम्हाला लवकर थकवा येऊ शकतो किंवा तुम्हाला शरीर दुखू शकते. डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींची पुष्टी करत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता..सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.