Marathi Sant Literature: विश्‍वपट ब्रह्म दोरा

Tati Ughada Dnyaneshwara The Power of Love and Wisdom: ‘ताटी उघडा ज्ञानेश्वरा’ या हाकेतून व्यक्त होते ममता, करुणा आणि विश्वकल्याणाचा विचार
Sant Muktabai Tati Che Abhang The Powerful Message of Motherly Love Wisdom and Social Welfare in Marathi Philosophy

Sant Muktabai Tati Che Abhang The Powerful Message of Motherly Love Wisdom and Social Welfare in Marathi Philosophy

sakal

Updated on: 

-डॉ. रूपाली शिंदे

तत्त्वज्ञान, उपदेश आणि संवाद यांचा त्रिवेणी संगम म्हणजे ‘ताटीचे अभंग’! मुक्ताबाई आपल्या मोठ्या भावाशी संवाद साधतात हा ‘मुक्ता आणि ज्ञानाचा संवाद’ आहे. तो केवळ ज्ञान देण्याचा अथवा बोधपर, मुक्तीचा संवाद नाही. त्यात ‘ताटी उघडा ज्ञानेश्‍वरा’ असा प्रेमळ आग्रह आहे. आईची माया आणि समाजहितकारक करुणा यांचा संयोग ‘ताटी उघडा ज्ञानेश्‍वरा।’ या उद्‍गारामध्ये झाला आहे. ती आर्त साद घालणाऱ्या मुक्ताबाई ज्ञानोबांची आई झाल्या आहेत. आईचे रागावणे, प्रेम करणे अगदी शब्दांचे फटकारे ही एक प्रकारची मंत्रशक्तीच असते. कारण ऐकणाऱ्याचे काळीज हेलावून टाकण्याची ताकद त्या शब्दांत असते. ‘ताटी उघडा ज्ञानेश्‍वरा’ ही प्रेमळ हाक ज्ञानदेवांच्या मनात ‘विश्‍वाचे आर्त’ जागवते. ममता आणि ज्ञान यांचा अद्वैत संवाद ताटीच्या अभंगरचनेत झाला आहे.

Loading content, please wait...