माझी मुलगी १७ वर्षांची आहे. मागच्या वर्षी तिचा अपघात झाला व तिच्या हाताची शस्त्रक्रिया करावी लागली. हातावर शस्त्रक्रियेचा व्रण दिसतो आहे. त्यासाठी काही उपाय करता येईल का ?
- चित्रा बुगडे
उत्तर - व्रणावर त्वरित उपचार केल्यास डाग कमी व्हायला सोपे होते. तिच्या व्रणावर संतुलन रोझ ब्युटी सिद्ध तेलासारखे तेल दिवसातून २-३ वेळा हलक्या हाताने जिरवावे. तसेच घरच्या घरी रक्तचंदन व हळकुंड सहाणेवर उगाळून तयार केलेल्या गंधात थोडा कोरफडीचा ताजा गर मिसळून तयार केलेल्या मिश्रणाचा लेप व्रणावर दिवसातून एकदा लावावा. या गोष्टी सातत्याने बरेच महिने केल्यावर चांगला गुण येताना दिसतो.