Namma Homeopathy : प्रगत व शाश्वत उपचार करणारी कर्नाटक, महाराष्ट्रातली सर्वोत्तम आरोग्य प्रणाली

 Namma Homeopathy
Namma HomeopathySakal
Updated on

नम्मा होमिओपॅथी कर्नाटक आणि महाराष्ट्र येथे असलेली होमिओपॅथी पद्धतीची प्रथम क्रमांकाची, अग्रेसर आणि अतिशय प्रगत अशी चिकित्सालयांची शृंखला असून जागतिक ठिकाणी होमिओपॅथीच्या क्षेत्रात सर्वोत्तम आरोग्य सेवा पुरविण्यासाठी अनुभवसिद्ध अशी दूरदृष्टी असलेली संस्था आहे.

Namma Homeopathy
Namma HomeopathySakal

नम्मा होमिओपॅथीची स्थापना २०१७ मध्ये झाली आणि आज कर्नाटक आणि महाराष्ट्र राज्यांमध्ये आमच्या २० शाखा आणि २०० हून अधिक निष्णात आणि अनुभवी आणि अर्हताप्राप्त डॉक्टर असून त्यांनी आजवर एक लाखांहून अधिक नव्या आणि जुन्या रुग्णांवर यशस्वी उपचार केले आहेत. त्यांचे दादर मुंबई येथील चिकित्सालय ही आशियामधील सर्वात मोठी होमिओपॅथिक शाखा आहे.

  नम्मा होमिओपॅथी केंद्राच्या कर्नाटकामधील ११ शाखा मल्लेश्वरम, जयनगर, म्हैसूर, हसन, दावणगेरे, हुबळी, शिमोगा, गुलबर्गा, होस्पेट, उडुपी आणि बेळगाव येथे असून महाराष्ट्रातील ११ शाखा मुंबई-दादर, ठाणे, सोलापूर, पुणे, कोल्हापूर, औरंगाबाद, नाशिक, नागपूर, नांदेड, अकोला आणि रत्नागिरी या ठिकाणी आहेत. या ठिकाणी आमचे मानव संसाधन, माहिती तंत्रज्ञान, रुग्ण समुपदेशन, औषधशाळा, दूरध्वनी केंद्र आणि इतर आवश्यक अशा वेगवेगळ्या विभागात काम करणारे ६०० कर्मचारी कार्यरत आहेत.

Namma Homeopathy
Namma HomeopathySakal

नम्मा होमिओपॅथीचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक डॉ. मोरे रघु प्रसाद हे होमिओपॅथीचे गेल्या १५ वर्षांहून अधिक काळ एक समर्पित व्यावसायिक असून ते नम्मा होमिओपॅथीचे संस्थापक देखील आहेत.

नम्मा होमिओपॅथी ही एक एकात्मिक आरोग्य प्रणाली असून त्यामध्ये रुग्णांसाठी शाश्वत उपाय करून उपचार करण्यावर भर दिला जातो. नम्मा होमिओपॅथी यांनी आपल्या अत्यंत प्रगत अशा नव्या होमिओपॅथिक सूत्रामधून मधुमेह, आर्थ्रायटिस, व्हॅरिकोज व्हेन्स, गँगरीन आणि अशा अनेक असाध्य आणि शस्त्रक्रियेविना अशक्य मानल्या गेलेल्या रुग्णांवर यशस्वी उपचार केले असून त्यामध्ये सर्वाधिक यशस्विता दर प्राप्त केला आहे. नम्मा होमिओपॅथी हे होमिओपॅथी ही प्राथमिक उपचार पद्धती म्हणून त्यात निष्णात आहेत आणि ते प्रत्येक वैयक्तिक रुग्णाच्या शारीरिक, मानसिक आणि भावनिक आरोग्य डोळ्यासमोर ठेवतानाच माफक दरामध्ये रुग्णाशी संवाद साधण्यासाठी तसेच रोगाचे निदान आणि जागतिक पातळीचे उपचार मिळण्यासाठी गुणवत्तापूर्ण वेळ देतात. नम्मा होमिओपॅथी यांनी लाखो संख्येमधील मानवांना एक नवी आशा आणि नवा धीर दिला आहे.

Namma Homeopathy
Namma HomeopathySakal

नम्मा मध्ये सर्वात अगोदर सर्वसमावेशक दृष्टीकोन असतो. नम्मा या शब्दाचा अर्थ ‘आमचे’ असा होतो आणि हा शब्द आरोग्यपूर्ण समाज निर्माण करण्याची जबाबदारी आमची आहे या आमच्या श्रद्धेवरून आम्ही तयार केला आहे. कर्तव्याच्या जाणिवेतून काम करणे, कामगिरी जबाबदारीने करणे आणि प्रामाणिकपणे काम करणे यासाठी हा शब्द आम्हाला प्रेरणा देत असतो. नम्मा होमिओपॅथीच्या बंगलोर येथील संशोधन विभागात ५० हून अधिक अतिशय निष्णात आणि प्रतिभासंपन्न असे डॉक्टर्स असून ते वैशिष्ट्यपूर्ण अशा इम्युनोजेनिक माईसमॅटिक पद्धतीमधील ६व्या पिढीच्या होमिओपॅथिक उपचार प्रक्रियेमधून असाध्य रोगांसाठी नवी औषधे आणि नवी सूत्रे यांच्या संशोधनात मग्न आहेत. इम्युनोजेनिक माईसमॅटिक पद्धतीमधील ६व्या पिढीच्या होमिओपॅथिक उपचार प्रक्रियेमध्ये औषधे ही रोगप्रतिकारक पेशींच्या संदर्भात काम करतात आणि त्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती सुधारते यालाच इम्युनोजेनिक असे म्हणतात. ही औषधे रोगाच्या मूळ कारणावर कार्य करून हे कारण दूर करण्यासाठी काम करतात यालाच माईसमॅटिक असे नाव आहे. ही पद्धती नवीन पिढीच्या जीवनशैलीनुसार आणि सध्याच्या पर्यावरणाच्या परिस्थितीला अनुसरून असतात. याला सहावी पिढी असे म्हटले जाते. रोग, विषाणू, सूक्ष्म जंतू, महामारी, आणि आजच्या जीवनशैलीची परिस्थिती यांच्यावरील प्रदीर्घ संशोधनानंतर नम्मा होमिओपॅथीच्या संशोधक चमूने ही पद्धती विकसित केली असून तिला जुन्या आणि असाध्य मानल्या गेलेल्या वंध्यत्व, मधुमेह, थायरॉईड रोग, पीसीओडी, अॅलर्जी, दम, सोरिअॅसीस, व्हिटीलिगो, पाठदुखी, व्हॅरिकोज व्हेन्स, केसांची गळती, सांधेदुखी, गॅस्ट्रायटिस, मुळव्याध, डोकेदुखी, चिंता, नैराश्य तसेच लैंगिक प्रश्न यासारख्या रोगांवर आपल्या चिकित्सालयांमधून ८०% ते ९० % यशस्विता दर प्राप्त केला आहे. नम्मा होमिओपॅथी यांनी आपल्या या नव्या उपचार पद्धतीमधून रुग्णांवर यशस्वी उपचार केल्याची एक लाखपेक्षा अधिक उदाहरणे आहेत. आमच्या रुग्णांना कोणत्याही दुष्परिणामांशिवाय संपूर्ण उपाय देण्यासाठी आम्ही भरघोस प्रयत्न करतो. नम्मा होमिओपॅथीच्या औषधांमध्ये रूग्णाला भावनिक तसेच मानसिक रीतीने चांगले करण्याची शक्ती आहे.

Namma Homeopathy
Namma HomeopathySakal

त्यांच्याकडे दिवसाचे चोवीस तास सुरु असणारे एक कॉल सेंटर असल्यामुळे लोकांना या आधुनिक विज्ञानाचा उपयोग करून आमच्यापर्यंत पोचता येऊन मोफत सल्ला मिळवता येतो. नम्मा होमिओपॅथीच्या सर्व २० शाखा या एकमेकांशी संगणकाने जोडलेल्या आहेत. रुग्णांना कुठेही उपचार सुरु करता येतात आणि त्यांना सोयीचे असेल अशा ठिकाणी ते आपले उपचार सुरु ठेवू शकतात.

नम्मा होमिओपॅथी यांनी आता आपले एक वेब पोर्टल सुरु केले असून येथे लोकांना जगातील कोणत्याही भागातून आणि कोणत्याही वेळी ऑनलाईन सल्ला मिळू शकतो.

अनेक संस्था आणि आस्थापना यांनी नम्मा होमिओपॅथी यांना “होमिओपॅथीच्या क्षेत्रातील सर्वोत्तम आरोग्य सेवा आणि उपचार” हा सन्मान प्रदान केला आहे.

To Know more details please click here

For further details and consultation
Please contact 9513 595 595.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com