
थोडक्यात:
मेथीचे दाणे वर्षभर उपलब्ध, हवाबंद डब्यात टिकणारे आणि आरोग्यासाठी फायदेशीर आहेत.
स्त्रियांसाठी मेथी हे उत्तम टॉनिक असून आहारात नियमित समावेश करावा.
मोड आलेली मेथी चवीला कडू लागत नाही आणि विविध पदार्थांमध्ये वापरता येते.
How to Use Methi Powder for Hair Growth: मेथीची आपल्या मनातील भावना म्हणजे कडवटपणा. या कडू चवीमुळे बहुतेकांच्या पसंतीला ही मेथी उतरत नाही. खरेतर इथे आज बोलणार आहोत मेथीच्या दाण्यांविषयी. फेनुग्रीक सीड्स म्हणजे मेथीचे दाणे. पालेभाजीविषयी पुन्हा केव्हातरी. फेनुग्रीक सीड्स म्हणजे मेथीचे दाणे. मेथीचे दाणे वर्षभर सहज मिळतात आणि घरी हवाबंद डब्यात टिकतातही. बाळंतपणात मेथीचे लाडू ही संकल्पना आपल्याकडे फक्त तेवढ्यावरच राहते. स्त्रियांसाठी मेथी ही एक उत्तम टॉनिक आहे आणि म्हणून आहारात तिचा नित्य वापर श्रेयस्कर ठरतो.
मोड आलेली मेथी फ्रीजमध्ये ८-१० दिवस टिकते. कडू लागत नाही व डाळी, उसळी, पिझ्झा, नूडल्स, सॅलड इत्यादींमध्ये घालता येते. स्त्रियांमध्ये वारंवार केसांच्या तक्रारी उद्भवतात, त्यासाठीही मेथीचा उत्तम वापर करता येतो.