कॅन्सर फक्त नाव जरी ऐकलं तरी अंगावर शहारे येतात. अनेकांचा भितीने थरकाप उडतो. इतके दिवस कॅन्सरसारखा आजार देशातील काहीच रूग्णांना होत होता. पण आता हा आजार गल्लीबोळातही पसरला आहे. गल्लीपासून मोठे सेलिब्रिटीजही या आजाराला बळी पडत आहेत. कॅन्सर बरा होऊ शकत नाही, असे चित्र असताना एक आशादायी गोष्ट घडलीय.
पंजाब काँग्रेसचे माजी अध्यक्ष नवज्योत सिंग सिद्धू या कठीण काळाबद्दल नुकताच खुलासा केला आहे. नवज्योत सिद्धू यांच्या पत्नी नवज्योत कौर यांनी कर्करोगाविरुद्धची लढाई जिंकली आहे. नवज्योतसिंग सिद्धू यांनी नुकतेच पत्नी कर्करोगमुक्त असल्याची घोषणा केली