नवरात्रीच्या उपवासाला 'हे' एनर्जेटिक पेय पिल्यास होईल फायदा; दिवसभर रहाल फ्रेश | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

navratri 2022

नवरात्रीच्या उपवासाला 'हे' एनर्जेटिक पेय पिल्यास होईल फायदा; दिवसभर रहाल फ्रेश

नवरात्रीचा नऊ दिवसांचा उत्सव हा ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत सुरु राहणार आहे. दुर्गादेवीचे भक्त नवरात्रीतील नऊ दिवस उपवास करतात. उपवासात फळांचा फराळ केला जातो. या सणामध्ये फक्त तांदूळ, गव्हाचे पीठ, राजगिरा पीठ, सिंघरा पीठ, साबुदाणा यांचा वापर केला जातो. योग्य प्रथिने, कर्बोदके, निरोगी चरबी, जीवनसत्त्वे आणि खनिजे यांचा समतोल आहार घेतल्यास उपवासात निरोगी राहण्यास मदत होते. या काळात काही लोकांना ऊर्जा कमी वाटण्याची शक्यता असते. त्यामुळे तुम्ही आहारात काही एनर्जेटिक आणि ताज्या पेयांचा समावेश करू शकता.

पुदिना लस्सी

नवरात्रीच्या उपवासात स्वतःला हायड्रेट ठेवण्यासाठी तुम्ही तुमच्या आहारात पुदिन्याच्या लस्सीचा समावेश करू शकता. ताजेतवाने मिंट लस्सी पिल्यानंतर तुम्ही स्वतःला रिचार्ज फील कराल.

चिकूशेक

हे पेय सर्वात सोप्या मार्गाने तयार करता येते. यासाठी तुम्हाला फक्त तीन गोष्टींची गरज आहे. यासाठी ब्लेंडरमध्ये चिकू, दूध आणि साखर घालून शेक तयार करा. हा मिल्कशेक तुम्हाला आणि पोटाला आनंदी ठेवू शकतो.

हेही वाचा: भाज्या, सलाडचे पौष्टिक मूल्य टिकवून ठेवण्याचा उत्तम मार्ग; जाणून घ्या कोणता?

ताक

हे एखाद्याच्या शरीराचे तापमान संतुलित करण्यास मदत करते आणि जर तुम्ही फळांचा आहार घेत असाल तर हा एक आरोग्यदायी पर्याय आहे. मात्र हे ताक पित असताना तुम्ही रॉक मीठाचा वापरा करा.

बदामाचे सरबत

बदामाचे सरबत वेलची आणि केवरा घालून बनवता येते. या चविष्ट पेयामध्ये असलेले प्रथिने तुम्हाला त्वरित ऊर्जा देते.

नारळ पाणी

सहज उपलब्ध असलेले ताजे नारळ पाणी हे नवरात्रीच्या उपवासासाठी उत्तम आरोग्यदायी पेय आहे. हे नैसर्गिक इलेक्ट्रोलाइट्स, जीवनसत्त्वे आणि खनिजे यांचे समृद्ध स्त्रोत आहे. नारळ पाणी ऊर्जा वाढवते.

गुडी-गुड

सर्वात उत्साहवर्धक आणि ताजे पेय म्हणून तुम्ही याकडे पाहू शकता. जो गुळाचा वापर करून बनवला जातो. ते तयार करण्यासाठी, पाणी उकळवा आणि नंतर थंड करा. हे एक सुपर हायड्रेटिंग पेय आहे ज्यामध्ये मजबूत इम्युनो-बूस्टिंग आणि डिटॉक्स गुणधर्मही आहेत.

हेही वाचा: Vastu Tips : तुम्हीही आर्थिक संकटाचा सामना करत आहात का? आजच करा 'हे' वास्तु उपाय

टरबूज आणि तुळस पंच

ताजी तुळस आणि लिंबाचा रस चिमूटभर काळे मीठ मिसळून ते बनवता येते. त्यात टरबूजचे तुकडे टाकून त्यावर बर्फ टाकता येतो. हे प्यायल्याने तुम्हाला फ्रेश वाटेल आणि तुमचा उत्साहही वाढेल.

ग्रीन टी

या दिवसांत आहारतज्ज्ञ एक कप ग्रीन टी पिण्याची शिफारस केली जाते. ही टी तुम्ही थंड स्वरूपातही पिऊ शकता. ग्रीन टी थंड करा आणि त्यात थोडे लिंबू, मध आणि आल्याचा रस घाला. त्यावर पुदिन्याच्या पानांनी सजवा.