

When Neck Pain Radiates to Arm and Fingers
Sakal
डॉ. जयदेव पंचवाघ (मेंदू आणि स्पाईन सर्जन)
आरोग्य‘चेतना’
तीव्र वेदनेमुळे नेहा भल्ला अक्षरशः हतबल झाल्या होत्या. वेदनेने विव्हळणं म्हणजे काय, हे त्यांच्याकडे बघून आजूबाजूच्यांना स्पष्ट जाणवत होते. अनेकदा आपण ‘तडफडणे’ वगैरे शब्द अतिशयोक्ती म्हणून वापरतो; पण त्या दिवशी त्यांच्या त्रासासमोर ते शब्दही तोकडे पडत होते. गेल्या तीन महिन्यांपासून त्यांची मान पूर्णपणे आखडली होती. त्यांच्या भाषेत सांगायचे, तर मान ‘लॉक’ झाली होती.