

"तुमची अंगठी किंवा चपला बसत नाहीत?" शरीरातील हे बदल पिट्युटरी ग्रंथीच्या गाठीचे संकेत असू शकतात!
Sakal
डॉ. जयदेव पंचवाघ, मेंदू आणि स्पाइन सर्जन
शरीरातील विविध ग्रंथींमधून रक्तप्रवाहात स्रवणारी आणि रक्ताभिसरणाबरोबर शरीरभर पसरून विविध अवयवांच्या कार्यांवर प्रभाव टाकणारी अतिविशिष्ट रसायनं म्हणजेच संप्रेरकं किंवा हॉर्मोन्स.
मेंदूच्या तळाशी असणाऱ्या पिट्युटरी ग्रंथीद्वारे शरीरातल्या महत्त्वाच्या संप्ररकांचं संतुलन ठेवलं जातं. या ग्रंथींच्या गाठींमध्ये दिसणारी लक्षणं विशिष्ट प्रकारची असतात. या लक्षणांबाबत योग्य जागृती फक्त सर्वसामान्य जनतेतच नव्हे, तर जनरल प्रॅक्टिशनर्समध्येसुद्धा असणं गरजेचं आहे. लक्षणांचा अयोग्य अर्थ लावल्यामुळे किंवा लक्षणांकडे दुर्लक्ष झाल्यामुळे या गाठींचं निदान उशिरा झाल्याचं अनेकदा दिसतं.