आरोग्य‘चेतना’ : पाठदुखी, कंबरदुखी ‘गंभीर’ कधी असते?

दैनंदिन पाठदुखीला ‘सामान्य’ समजण्याची चूक; लाल कंदील ओळखून वेळेत निदान व उपचार का गरजेचे, तज्ज्ञ डॉक्टरांचा इशारा
Understanding Back Pain: Common Strain vs. Serious Warning Signs

Understanding Back Pain: Common Strain vs. Serious Warning Signs

Sakal

Updated on

डॉ. जयदेव पंचवाघ, मेंदू आणि स्पाइन सर्जन

आजच्या धावपळीच्या आणि तंत्रज्ञानाने व्यापलेल्या जीवनात ‘पाठदुखी’ आणि ‘कंबरदुखी’ ही एक इतकी ‘कॉमन’ समस्या आहे की जवळजवळ ९० टक्के लोकांना ती कमी-अधिक प्रमाणात होतेच. आपल्यातल्या प्रत्येकाला आयुष्यात कधी ना कधी, कोणत्या तरी टप्प्यावर या त्रासाला सामोरे जावं लागतं. मग तो तासन्‌तास लॅपटॉपसमोर चुकीच्या पद्धतीने बसून काम करणारा आयटी व्यावसायिक असो, घरकामात सतत उभी राहणारी गृहिणी असो, ‘खड्डेमय’ रस्त्यांवरून रोज दुचाकीवरून प्रवास करणारा चाकरमानी असो, किंवा शेतात राबणारा शेतकरी असो. ही समस्या इतकी ‘कॉमन’ झाली आहे, की आपण तिला आपल्या दैनंदिन जीवनाचा एक अविभाज्य भागच मानून चालतो. परंतु, नेमक्या याच दुखण्यामध्ये कधीकधी धोका दडलेला असू शकतो.

ही समस्या ‘कॉमन’ असल्यामुळेच अनेकदा एखाद्या गंभीर आजाराची पाठदुखी आपल्याकडून दुर्लक्षित होते. ‘असेल काहीतरी, थोडा बाम लावला किंवा एक गोळी घेतली की बरं वाटेल,’ अशा निष्काळजीपणामुळे अनेक रुग्ण तज्ज्ञांपर्यंत खूप उशिरा पोहोचतात, आणि तोपर्यंत आजाराने गंभीर स्वरूप धारण केलेले असते.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com