

US Cardiologist Publishes New Guidelines for Managing Cholesterol
sakal
Health News in Marathi : आजकाल बदलती जीवनशैली, असंतुलित आहार, बैठी काम आणि व्यायामाचा अभाव यामुळे डायबिटीज, ब्लड प्रेशरसोबतच हार्ट अटॅक आणि स्ट्रोकचंही प्रमाणही वाढलं आहे. यामागे बऱ्याचदा वाढलेलं किंवा शरीरात साठलेलं कोलेस्ट्रॉल कारणीभूत असू शकतं.
त्यामुळेच अमेरिकेतील प्रसिद्ध हृदयतज्ज्ञांनी (Cardiologist) नुकत्याच कोलेस्ट्रॉल नियंत्रणासाठी नव्या मार्गदर्शक सूचना जाहीर केल्या आहेत. आणि या सूचना खूप महत्त्वाच्या मानल्या जात आहेत. या नव्या गाईडलाइन्स अमेरिकन कॉलेज ऑफ कार्डिओलॉजी आणि अमेरिकन हार्ट असोसिएशन यांनी एकत्र येऊन तयार केलेल्या या गाईडलाइन्स 2018 मधल्या जून्या गाईडलाइन्स ऐवजी आता पाळल्या जातील.