
New Vaccine On Heart Attack By Chinese Research Scientists: आजकाल हार्ट अटॅक येणाऱ्या आणि हार्ट अटॅक येऊन मृत्यमुखी पडणाऱ्या रुग्णांची संख्या वाढली आहे. भारतातील एकूण मृत्यूंपैकी २७% मृत्यू हार्ट अटॅकमुळे होतात. विशेषतः तरुणांमध्ये ही समस्या वाढताना दिसत आहे. पण आता या आजारावर प्रभावी उपाय सापडल्याचा दावा करण्यात आला आहे. वैज्ञानीकांनी हार्ट अटॅकवर लस तयार केल्याचा दावा केला आहे.