
Care After C- Section Delivery: बाळ जन्माला येण्याचा संपूर्ण प्रवास आईसाठी शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या महत्त्वाचा असतो. मातृत्वाच्या या काळात स्त्रीला वेगवेगळे अनुभव येतात, कधी वेदना तर कधी अतूट आनंद. गर्भधारणेदरम्यान पोषणयुक्त आहार घेण्याचा सल्ला दिला जातो, जेणेकरून बाळाची योग्य वाढ होईल. मात्र, काही कारणांमुळे अनेकदा महिलांना सिझेरिअन प्रसूतीचा (C-Section) सामना करावा लागतो.
सिझेरिअन झाल्यानंतर शरीर पूर्ववत होण्यासाठी अधिक काळ लागतो. त्यामुळे स्त्रीने स्वतःच्या आहाराकडे विशेष लक्ष देणे गरजेचे असते. चुकीच्या आहारामुळे टाके लवकर न सुकणे, पचनासंबंधी तक्रारी आणि शारीरिक दुर्बलता यासारख्या समस्या निर्माण होऊ शकतात. त्यामुळे काही पदार्थ टाळणे आवश्यक आहे.