Smoking Side Effects: धुम्रपानामुळे Heart होवू शकत कमकुवत आणि जाड, काय सांगतंय नवं संशोधन?

Smoking Side Effects: नुकत्याच झालेल्या एका संशोधनानुसार स्मोकिंगमुळे हृदय जाड आणि कुमकुवत होतं. अर्थात या स्थितीमुळे जीवघेण्या आजारांचा सामाना करावा लागू शकतो.
Smoking Side Effects
Smoking Side EffectsEsakal

Smoking Side Effects: मानवी शरिरातील महत्वाचा अवयव म्हणजे हृदय. हृदयाचं आरोग्य चांगल असले तर अनेक आजारांवर Ailments मात करणं सहज शक्य होतं. मात्र अलिकडे हृदयाशी Heart संबंधित समस्या निर्माण होऊ लागल्याने चिंतेचं वातावरण निर्माण झालं आहे.

अगदी कमी वयातच हृदयासंबधीत समस्या वाढताना दिसत आहेत. बदलेली जीवनशैली आणि आहारांच्या सवयींमुळे कमी वयात हार्ट अटॅक येण्याचं प्रमाणही वाढलं आहे. New Research about Smoking shown shocking Results

या मागचं एक महत्वाचं कारणं म्हणजेच धूम्रपान म्हणजेच स्मोकिंग Smoking . केवळ व्यसन म्हणून नव्हे तर अलिकडे एक स्टेटस किंवा स्टाइल स्टेटमेंट म्हणून अनेक तरुण स्मोकिंगकडे वळू लागले आहे.

कालांतराने ही सवय व्यसनात बदलते आणि आरोग्यचं नव्हे तर आयुष्य धोक्यात येतं. धूम्रपान केल्याने रक्तवाहिन्या ब्लॉक होतात ज्यामुळे कोरोनरी हार्ट डिजीज आणि स्ट्रोकचा Heart Disease धोका वाढतो हे कदाचित अनेकांना ठाऊक असेल.

मात्र नुकत्याच झालेल्या एका संशोधनानुसार स्मोकिंगमुळे हृदय जाड आणि कुमकुवत होतं. अर्थात या स्थितीमुळे जीवघेण्या आजारांचा सामाना करावा लागू शकतो.

एखादी व्यक्ती जितकं जास्त धूम्रपान करते तितकचं तिचं हृदयाचं कार्य बिघडतं जातं असं या संशोधनात समोर आलं आहे. या रिसर्चनुसार जेव्हा लोकांनी ही सवय सोडली तेव्हा त्यांच्या हृदयाचं कार्य पुन्हा सुरळीत झालं. जाणून घेऊया कशाप्रकारे एक छोटीशी सिगारेट तुमच्या हृदयावर विपरीत परिणाम करू शकते.

सिगारेट आणि हृदयाचा संबध

धूम्रपान करणाऱ्यांच्या हृदयाच्या डाव्या चेंबरमध्ये रक्ताचं प्रमाण कमी होतं आणि शरीराच्या इतर भागात ते पंप करण्याची शक्ती कमी होते. त्यामुळे जितकी जास्त सिगारेट ओढली जाते तितकं हृदयाचं कार्य बिघडतं.

एखाद्या व्यक्तीला जर वेळीच धूम्रपानाच्या दुष्परिणामांची जाणीव झाली आणि त्याने धूम्रपान बंद केलं तर हृदयाचं कार्य काही प्रमाणात पूर्ववत होऊ शकतं. त्यामुळे सिगारेट सोडण्यासाठी उशीर करू नका

हे देखिल वाचा-

Smoking Side Effects
Passive Smoking : तुम्ही जरी सिगारेट पित नसला तरी समोरच्याच्या सिगारेटमधून निघणारा धूरही घेऊ शकतो तुमचा जीव

WHOची आकडेवारी

WHO नुसार तंबाखूमुळे दरवर्षी ८० लाखांहून अधिक लोकांचा मृत्यू होतो. तर धूम्रपान करणाऱ्यांमध्ये टाळता येण्याजोग्या मृत्यूंपैकी ५० टक्के मृत्यूसाठी सिगारेट जबाबदार आहे.

तर यातील निम्मे मृत्यू हृदयविकाराचा झटका आणि स्ट्रोक यांसारख्या एथेरोस्क्लेरोटिक हृदय आणि रक्तवाहिन्यांशी संबंधीत रोगांमुले होतात. याशिवाय धमन्यांवर धूम्रपानाचा परिणाम होवून त्यासंबधी विकार होण्याची शक्यता बळावते. 

नवा शोध काय सांगतं?

हृदय आणि रक्तवाहिन्यांसंबधी आजार नसतानाही धूम्रपानाचा हृदयाच्या कार्यात आणि संरचनेतील बदलांशी काही संबध आहे का याचा नव्या आभ्यासात शोध घेण्यात आला. यासाठी १८ ते ९९ या वयोगटातील ३,८७४ सहभागी लोकाचं विश्लेषण करण्यात आलं. 

या लोकांना कोणत्याही हृदयासंबधी समस्या नव्हत्या. यात ५६ वर्ष वय असलेल्या ४३ टक्के महिला होत्या. या अभ्यासात असं निदर्शनास आलं की स्मोकिंग न करणाऱ्यांच्या तुलनेत स्मोकिंग करणाऱ्याचं दृदय जाड, कुमकुवड आणि वजनदार होतं.

या व्यतिरिक्त या संशोधनात संशोधकांन  असं आढळून आलं की जे लोक गेल्या १० वर्षांपासून सातत्याने धूम्रपान करत आहेत त्याचं हृदय हे १० वर्षांपूर्वी धूम्रपान सोडलेल्या लोकांपेक्षा अधिक जाड, जड आणि कुमकुवत आहे.

Smoking Side Effects
Quit Smoking: स्मोकिंगला करा कायमचा बाय; करा हे उपाय

धूम्रपानामुळे केवळ रक्तवाहिन्यांच नुकसान होत नसुन थेट हृदयाला हानी पोहचत असल्याचं या संशोधनातील अहवालातून स्पष्ट झालं आहे. त्यामुळे वेळीची वाट न पाहता धूम्रपान बंद करणे हाच योग्य पर्याय आहे.

एका आरोग्यदायी जीवनशैलीचा मदतीने तसचं हेल्दी डाएट आणि व्यायामा करून हृदयाचं आरोग्य पूर्ववत करणं  शक्य आहे त्यामुळे वेळीच धूम्रपान सोडा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com