नऊ रसांचे जीवन

The Philosophy of Nine Rasas and Six Tastes in Ayurveda : आयुर्वेदानुसार मानवी जीवनात नऊ भावभावना आणि आहारातील सहा रसांना विशेष महत्त्व आहे. मधुर रस, शरीराचे पोषण, भक्तिभाव आणि शृंगार यांचा परस्परसंबंध जीवनाला संतुलित, समृद्ध आणि अर्थपूर्ण बनवतो.
युर्वेदानुसार मानवी जीवनात नऊ भावभावना आणि आहारातील सहा रसांना विशेष महत्त्व आहे. मधुर रस, शरीराचे पोषण, भक्तिभाव आणि शृंगार यांचा परस्परसंबंध जीवनाला संतुलित, समृद्ध आणि अर्थपूर्ण बनवतो.

युर्वेदानुसार मानवी जीवनात नऊ भावभावना आणि आहारातील सहा रसांना विशेष महत्त्व आहे. मधुर रस, शरीराचे पोषण, भक्तिभाव आणि शृंगार यांचा परस्परसंबंध जीवनाला संतुलित, समृद्ध आणि अर्थपूर्ण बनवतो.

esakal

Updated on: 

मुळात मनाचे रस आठ आणि त्यात आणखी एक आत्म्याचा भक्तिरस. सर्व रसांचा शृंगार रस हा राजा! परंतु शृंगार या शब्दाच्या भावात इंग्रजीतील मेक अप या शब्दाचा भाव येत नाही. नुसती पावडर लावणे, आय-ब्रो करणे म्हणजे शृंगार नाही तर शृंगार हा एक रस आहे. शरीराचे हावभाव, शरीरातील ऊर्जा प्रेममय होऊन सर्वांना व्याप्त करू इच्छिते व त्यातल्या त्यात एखाद्या आवडत्या व्यक्तीवर जास्त आकर्षित करते तो शृंगार रस. शृंगार रस व्यक्त होण्यासाठी शरीराची साथ तर हवीच. ‘शरीरमाद्यं खलु धर्मसाधनम्‌’ असे उगाच म्हटलेले नाही. जीवनाचे साफल्य नऊ रसांतच सापडते. चतुर्विध पुरुषार्थ किंवा चार प्रकारचे अन्न एवढ्यावर सर्व होणार नाही. शरीरामध्ये सर्व धातू व्यवस्थित असले आणि प्रत्येक क्षेत्रात वयोपरत्वे काही तरी कार्य सिद्ध केलेले असले तरी भक्तिरसाशिवाय समर्पण नाही. भक्तिरसाच्या समर्पणासाठी, भक्तिरसाला चलितही करण्यासाठी लागतो शृंगार रस. हा व्यक्त होण्यासाठी शरीर हे माध्यम आवश्‍यक असते.

Loading content, please wait...