Niralamb Padma Sarvangasana: नीरालंब पद्म सर्वांगासन या आसनाचा सराव सर्वांगासन व पद्मासन ही दोन्ही आसने उत्तम्मरीत्या जमू लागल्यानंतर सुरु करावा..Parivrtta Parsvakonasana: कसे करावे परिवर्त पार्श्वकोनासन? जाणून घ्या हे आसन करण्याचे उत्कृष्ट फायदे.असे करावे आसन- यासाठी प्रथम पाठीवर झोपावे, त्यानंतर सर्वांगासनच्या स्थितीमध्ये यावे सर्वांगासन झाल्यानंतर दोन्ही पाय पद्मासनामध्ये घ्यावे.- आता पद्मासनाची जी मांडी आहे ती जमिनीला समांतर येईल या पद्धतीने जमिनीच्या दिशेकडे घ्यावी.- दोन्ही मांड्या जमिनीला समांतर असाव्यात..- आता हळूहळू निरालंब पद्म सर्वांगासन करण्यासाठी पाठीला दिलेला हाताचा आधार आपाण काढून घेणार आहोत व दोन्ही हाताचे तळवे हे सावकाश गुडघ्यावर ठेवण्याचा प्रयत्न करणार आहोत.- दोन्ही हाताचे तलवे गुडघ्यावर ठेवल्यानंतर छायाचित्रात दाखवल्याप्रमाणे आसनस्थिती करावी. या स्थितीमध्ये जेवढा वेळ स्थिर राहता येईल तेवढा वेळ स्थिर राहण्याचा प्रयत्न करावा..Titibhasana: कसे करावे टीटीभासन? जाणून घ्या या आसनाचे फायदे.लाभसर्वांगासनाचे सर्व फायदे या आसनामध्ये मिळतातच.- संपूर्ण शरीराचा रक्तप्रवाह सुरळीत होतो. डोळे, कान यांचे कार्य सुधारते. - थायरॉइडच्या हार्मोन्सचे संतुलन सुधारते, पचनशक्ती सुधारते..काळजी- ज्यांना मणक्याचे दुखणे, व्हर्टिगो, सर्दी, सायनस, गुडघेदुखी आहे, त्यांनी हे आसन करू नये. मनाली देव.सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.