
C-Section Boom in India:
Sakal
बाळ झाले की कुटुंबासह नातेवाईकही आनंदात असतात. पण, त्यातील बरेच जण प्रश्न विचारतात की प्रसूती नॉर्मल झाली की सिझेरियन? हा प्रश्न हल्ली प्रत्येक दांपत्याला ऐकवाच लागतो. बदललेली जीवनशैली, जंकफूड, व्यायामाचा अभाव, वाढलेले वजन, उशिराने होणारे लग्न आणि वेदना सहन करण्याबद्दल बदलेल्या महिलांच्या मानसिकतेमुळे सिझेरीयनचे प्रमाण वाढले. पण, ते कमी करणे शक्य आहे, असे निरीक्षण डॉ. राजेंद्रसिंह परदेशी यांनी दक्षिण आफ्रिकेतील केपटाउन येथे स्त्रीरोग तज्ज्ञांच्या आंतरराष्ट्रीय परिषदेत सादर केलेल्या शोधनिबंधात नोंदवले.