
Norovirus Spread In The US: अति थंड तापमानामुळे अमेरिकेच्या अनेक भागांमध्ये नोरोव्हायरसच्या रुग्णांमध्ये वाढ झाल्याचे दिसून आले आहे. हा एक सामान्य पण अत्यंत संसर्गजन्य व्हायरस असून, त्याला सामान्यतः "पोटाचा फ्लू" असेही म्हणतात. हा व्हायरस कोणत्याही वयोगटातील व्यक्तींना प्रभावित करू शकतो. मात्र, नोव्हेंबर ते एप्रिलदरम्यान याचे रुग्ण जास्त दिसून येतात.
सेंटर ऑफ डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेन्शन (CDC) च्या माहितीनुसार, डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात नोरोव्हायरसचे 91 रुग्ण नोंदवले गेले होते. गेल्या अनेक वर्षांतील हाच काळ विचारात घेतल्यास, ही संख्या दुप्पट आहे.