

Self Care and Personal Happiness Why Taking Time for Yourself Is Essential for Mental Health and a Balanced Life
sakal
-डॉ. स्मिता प्रकाश जोशी, समुपदेशक
प्रश्न: मी ७० वर्षांचा असून कुटुंबासाठी आजवर खूप कष्ट घेतले आहेत. मात्र, आज माझ्या अनुभवांना आणि मतांना घरात फारशी किंमत दिली जात नाही. अनेकदा मला न विचारता घरातील निर्णय घेतले जातात. मी काय करावे, कुठे जावे, काय करू नये, याबाबतही बंधने घातली जातात. माझे म्हणणे ऐकून घेण्याऐवजी मला काय करायचे आणि काय नाही, हे सांगितले जाते. आयुष्यभर कुटुंबासाठी योगदान दिल्यानंतरही माझ्या भावनांचा, विचारांचा आदर केला जात नाही, ही गोष्ट मनाला लागते. मला कोणावर वर्चस्व गाजवायचे नाही; पण माझेही म्हणणे ऐकले जावे, माझ्या अनुभवांचा आदर व्हावा आणि मला माझ्या पद्धतीने आयुष्य जगता यावे, एवढीच अपेक्षा आहे. ही घुसमट कशी थांबवावी?
उत्तर : आयुष्यभर कुटुंबासाठी कष्ट घेणे, जबाबदाऱ्या पार पाडणे आणि अनेक तडजोडी करणे यांमागे प्रेम आणि कर्तव्यभावना असते. त्यामुळे आयुष्याच्या या टप्प्यावर आपल्या अनुभवांना महत्त्व मिळावे, आपले म्हणणे ऐकून घेतले जावे आणि आपल्याशी आदराने वागले जावे, ही अपेक्षा स्वाभाविक आहे; पण प्रत्येक वेळी आपल्या अपेक्षेप्रमाणे प्रतिसाद मिळेलच असे नाही. इतरांनी आपल्याला किती महत्त्व द्यावे, हे आपण पूर्णपणे ठरवू शकत नाही; पण आपण स्वतःला किती महत्त्व द्यायचे, हे नक्कीच ठरवू शकतो.