लिंबूमध्ये व्हिटॅमिन सी, अँटिऑक्सिडंट्स, फायबर, पोटॉशियम, मॅग्नेशियम, कॅल्शियम, लोह, व्हिटॅमिन बी-६, सोडियम यासारखे घटक आढळतात.
सांगलीत विजापूर, बार्शी, परंडा या भागातून लिंबू विक्रीसाठी येतात. आवक कमी असून मागणी मात्र अधिक आहे. बाजारात सध्या प्रतिनग तीन ते पाच रुपये दराने (Lemon Rate) विक्री सुरू आहे. निर्यात वाढल्यामुळे स्थानिक बाजारात आवक घटल्याचे भाजीपाला व्यापारी दिलावर बागवान यांनी सांगितले. उन्हाळा असल्याने शहरात सरबत, पेयांचे गाडे ठिकठिकाणी लागलेत.