एका खासगी कार्यालयात काम करणाऱ्या रेणुका (कल्पित), वय ५२ यांचं गेल्या आठ-दहा वर्षांपासून वजन वाढलेलं होतं. रोज बसून काम, फारसा व्यायाम नाही आणि थोडं जास्त खाणं, यामुळे त्यांचा BMI ३२ झाला होता. त्यांना कोणतीही लक्षणं नव्हती..एक दिवस नियमित तपासणीत त्यांच्या स्तनात गाठ आढळली. बायॉप्सीमध्ये स्तनाचा कर्करोग निदान झाला. डॉक्टरांनी स्पष्ट सांगितलं की postmenopausal महिलांमध्ये स्थूलत्वामुळे स्तनाच्या कर्करोगाचा धोका वाढतो, आणि हे त्यांच्या केसमध्येही दिसून आलं.या केसचा उद्देश भीती निर्माण करणं नाही, तर हे समजून घेणं आहे, की आपलं वजन आणि जीवनशैली कर्करोगावर प्रभाव टाकू शकतात..स्थूलत्व हा केवळ सौंदर्याचा प्रश्न नाही - तो एक गंभीर वैद्यकीय आजार आहे. मधुमेह, हृदयविकार, उच्च रक्तदाब हे माहीत आहेतच; पण अनेकांना हे माहीत नाही, की स्थूलत्वामुळे कर्करोगाचा धोकाही वाढतो. या लेखात आपण स्थूलत्व म्हणजे काय, कर्करोगाचा धोका कसा वाढतो आपण कसं रोखू शकतो आदी गोष्टी समजून घेणार आहोत..स्थूलत्व म्हणजे काय?स्थूलत्व म्हणजे शरीरात गरजेपेक्षा जास्त चरबी जमा होणे. याचे मोजमाप BMI (Body Mass Index) याने केले जाते.बीएमआय आणि त्याचा अर्थ<१८.५ : कमी वजन१८.५–२४.९ : सामान्य२५–२९.९ : अधिक वजन (Overweight)३० : स्थूल (Obese).स्थूलत्वामुळे कर्करोगाचा धोका का वाढतो?हार्मोनल बदल : चरबी पेशीमध्ये (visceral fat) असलेले अॅरोमॅटेस एन्झाइम शरीरात एस्ट्रोजेन वाढवते. जास्त एस्ट्रोजेनमुळे स्तन, गर्भाशय आणि अंडाशयाचा कर्करोग होऊ शकतो.इन्सुलिन-IGF-१ मार्ग : स्थूल लोकांमध्ये इन्सुलिन-रेझिस्टन्स वाढतो, त्यामुळे वाढते IGF-१ आणि इन्सुलिन, जे पेशींची अनियंत्रित वाढ करतात. हे कोलन, पॅन्क्रियास, प्रोस्टेट, स्तन संबंधित कर्करोगांसाठी कारणीभूत ठरतात.दीर्घकालीन सूज (क्रोनिक इन्फ्लेमेशन) : चरबीमुळे शरीरात TNF-, IL-६, CRP सारखे सूजजनक घटक वाढतात. हे घटक डीएनएचे नुकसान करतात, ट्यूमरच्या वाढीस चालना देतात..रोगप्रतिकारक शक्ती कमी होते : स्थूल व्यक्तींच्या शरीरात टी-सेल्स आणि एनके सेल्स कमजोर होतात. त्यामुळे कर्करोगाच्या पेशी ओळखून नष्ट होण्याऐवजी सुरक्षित वाढतात.Adipokines बदल : चरबी पेशी लेप्टिन आणि adiponectin हार्मोन तयार करतात. स्थूल व्यक्तींमध्ये लेप्टिन वाढतो (कर्करोगास चालना देतो) आणि adiponectin कमी होतो (संरक्षण कमी होते).टिश्यू हायपॉक्सिया आणि अँजिओजेनेसिस : वाढलेली चरबी ऑक्सिजन कमी मिळाल्याने हायपॉक्सिया निर्माण करते. त्यामुळे नवीन रक्तवाहिन्यांची निर्मिती (अँजिओजेनेसिस) होते, ज्याचा फायदा कर्करोग घेतो..कोणते कर्करोग स्थूल लोकांमध्ये अधिक?जागतिक आरोग्य संघटना आणि जागतिक संशोधनांनुसार स्थूलत्वामुळे खालील १३ प्रकारच्या कर्करोगांचा धोका वाढतो :स्तनाचा कर्करोग (post-menopause), गर्भाशयाचा (endometrial), अंडाशयाचा, मोठ्या आतड्याचा (colon, rectum), स्वादुपिंडाचा (pancreas), यकृताचा (liver), किडनीचा, अन्ननलिकेचा (esophagus), पित्ताशयाचा, मेंदूतील मॅनिंजिओमा, थायरॉईड कर्करोग, पोटाच्या वरच्या भागाचा कर्करोग, मल्टिपल मायलोमा (रक्ताचा कर्करोग).वैज्ञानिक पुरावे, केस स्टडीजमेटा-अॅनालिसिस - बॅरिआट्रिक सर्जरी२०२३ मध्ये प्रसिद्ध झालेल्या मेटा-अॅनालिसिसनुसार, बॅरिआट्रिक सर्जरी झालेल्या व्यक्तींमध्ये कर्करोग होण्याचा धोका ३८ टक्क्यांनी कमी झाला. विशिष्ट कर्करोग जसे यकृत, स्तन, गर्भाशय, आतडे, स्वादुपिंड यांमध्ये धोका अधिक घटतो.GLP-१RA औषधे (उदा. लिराग्लूटाईड, तिरझेपाटाईड)अलीकडील अभ्यासांमध्ये ही औषधे वापरल्यावर वजनासोबतच कर्करोगाचा धोका लक्षणीय कमी झाल्याचे आढळले.भारतीय केस स्टडी : उत्तर भारतात पित्ताशयाच्या कर्करोगाच्या घटनांमध्ये स्थूलत्व आणि BMI वाढ हे एक घटक आढळले. शहरी स्त्रियांमध्ये postmenopausal स्थूलत्वामुळे स्तनाचा कर्करोग ३० टक्क्यांनी वाढल्याचे अभ्यासांमधून स्पष्ट झाले आहे..धोका कसा कमी करता येईल?वजन कमी करा.पाच-दहा टक्के वजन कमी केल्याने हार्मोन, इन्सुलिन, सूज यावर सकारात्मक परिणाम होतो.आरोग्यदायी आहार घ्या. अधिक: फळे, भाज्या, संपूर्ण धान्य, प्रथिने. कमी: साखर, मैदा, तेलकट व प्रक्रिया केलेले अन्नदररोज व्यायाम करा. रोज ३० मिनिटे चालणं, सायकलिंग, योगाधूम्रपान, मद्यपान टाळा. कर्करोगाचा धोका यामुळे अजून वाढतो.वेळेवर तपासणी आणि वैद्यकीय सल्लाडाएटीशियन किंवा वेट मॅनेजमेंट क्लिनिक यांचा सल्ला घ्यागरज असल्यास Bariatric Surgery किंवा GLP-१/GIP औषधांचा पर्याय.सारांशस्थूलत्व म्हणजे काय?शरीरात गरजेपेक्षा अधिक चरबी जमा होणेकर्करोग का होतो?हार्मोन, इन्सुलिन, सूज, रोगप्रतिकारक शक्ती कमीकोणते कर्करोग अधिक?स्तन, गर्भाशय, यकृत, आतडे, थायरॉईड, पित्ताशय इ.कसे टाळायचे?वजन कमी करा, आहार सुधारावा, व्यायाम करावेळेवर सल्ला का महत्त्वाचा?सुरुवातीलाच निदान झाल्यास कर्करोग टाळता येतो.स्थूलत्व तुमचं फक्त शरीरच नव्हे, तर पेशींचं वर्तनही बदलतं - आणि कर्करोगास आमंत्रण देऊ शकतं; पण योग्य जागरूकता आणि लढाऊ पाऊले घेऊन आपण या रिस्कला नाकारू शकत नाही..सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.