Obesity and Infertilitysakal
आरोग्य
स्थूलता आणि वंध्यत्व : अतूट संबंध
गर्भधारणेस असमर्थता किंवा वंध्यत्व (Infertility) ही अनेक महिलांसाठी आणि जोडप्यांसाठी एक मानसिक आणि शारीरिक तणाव निर्माण करणारी स्थिती असते.
गर्भधारणेस असमर्थता किंवा वंध्यत्व (Infertility) ही अनेक महिलांसाठी आणि जोडप्यांसाठी एक मानसिक आणि शारीरिक तणाव निर्माण करणारी स्थिती असते. यामागे अनेक कारणे असू शकतात, आणि त्यातले एक महत्त्वाचे आणि वाढत चाललेले कारण म्हणजे स्थूलता (Obesity).
आज जगभरात स्थूलतेचे प्रमाण वाढत आहे आणि त्याचा थेट संबंध प्रजनन क्षमतेशी जोडला जात आहे. स्त्री आणि पुरुष दोघांमध्येही जास्त वजन आणि चरबी प्रजनन प्रणालीवर प्रतिकूल परिणाम करतात.
