Office Yoga : स्क्रीन टाईम वाढल्याने एकाग्रता कमी झालीये? हे आसन करेल मदत

लोकांमधली एकाग्रता कमी होत असल्याचे अभ्यासातून समोर आले आहे.
Office Yoga
Office Yogaesakal

Office Yoga : सतत लॅपटॉप, कम्प्युटर, टॅबवर काम कलेल्याने साधारण ८ ते १० तास आपण सतत त्या स्क्रीनकडे बघत असतो. यातून चेंज हवा म्हणून टी.व्ही, मोबाईल बघतो. त्यामुळे आपला बहुतांश वेळ हा स्क्रीन बघण्यातच जात असतो. त्यामुळे लोकांमधली एकाग्रता कमी होत असल्याचे अभ्यासातून समोर आले आहे. जर तुम्हालाही असा अनुभव येत असेल, तुमची एकाग्रता कमी होत असल्याचे जाणवत असेल तर हे आसन तुम्हाला मदत करू शकते.

कुक्कुटासन हे बैठकस्थितीमधील तोलात्मक प्रकारचे आसन आहे. कुक्कुट म्हणजे कोंबडा. या आसनाची स्थिती कोंबड्याप्रमाणे दिसते असे समजून याला कुकुटासन असे नाव दिले आहे. हे जरासे अवघड आसन आहे. परंतु सरावाने व काळजीपूर्वक केल्यास जमू लागते.

असे करावे आसन

  • प्रथम पद्मासनात बसावे. डावा हात डाव्या मांडी व पोटरीमधून बाहेर काढावा.

  • उजवा हात उजव्या मांड व पोटरीमधून बाहेर काढावा.

  • दोन्ही हात बाहेर काढल्यावर दोन्ही हाताचे तळवे जमिनीला टेकवावे.

  • श्वास घ्यावा व श्वास सोडत हाताच्या तळव्यांवर जोर देत शरीर म्हणजेच पद्मासन जमिनीवरून वर उचलावे.

  • पूर्ण शरीराचा तोल दोन्ही हाताच्या तळव्यांवर सांभाळावा. श्वसन संथ सुरू ठेवावे.

  • शक्य तेवढा वेळ आसनस्थितीमध्ये स्थिर राहून ते टिकवावे.

  • आसन सावकाश सोडून हात हळूहळू पूर्वस्थितीत घ्यावे. हाताला झटका देऊ नये.

  • पूर्ण लक्ष केंद्रित करून आसन करावे. अन्यथा पुढे पडण्याची शक्यता असते.

Office Yoga
Office Yoga : सुटलेलं पोट कमी करायचंय? हे आसन कमी काळातच दाखवेल परीणाम

आसनाचे फायदे

  • या आसनामुळे मनगटाची ताकद वाढते.

  • पोटाच्या स्नायूंवर दाब येतो. त्यामुळे पचनसंस्थेशी संबंधित इंद्रियांचे कार्य सुधारते.

  • तोलात्मक आसन असल्याने एकाग्रता वाढण्यास उपयुक्त आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com